Mumbai Goa Highway Accident Saam tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर कार पुलावरून खाली कोसळली; वाहन अक्षरश: चक्काचूर, दोघांचा मृत्यू

Mumbai Goa Highway Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता.

Saam Tv

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबई-गोवा महमार्गावर कार पुलावरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर नजीक वावे दिवाळी गावाजवळ पुलावर भीषण अपघात झाला आहे. कोकणातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव कार थेट महार्गावरील पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात कार अक्षरश: चक्काचूर झाला. तर या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.

धावत्या कारने अचानक घेतला पेट

मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर खासगी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. पनवेलमधील तक्का येथे भर रस्त्यात वाहनाने पेट घेतला आहे. या आगीमध्ये संपूर्ण वाहन जळून खाक झालं आहे. वाहन चालक प्रसंगावधान साधत बाहेर पडल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

अहिल्यानगरमध्ये हिट अँड रनची घटना

अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील हिट अँड रनची घटना घडली आहे. अलिशान वाहनाने रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांसह दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना धडक दिल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातात चार चाकी, दुचाकी अशा अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे. या घटनेत सहा ते सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. दोन जण गंभीर जखमी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार वाहन चालक मद्य पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.

नगर कल्याण महामार्गावर अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

नगर कल्याण महामार्गावर ओतूर डोमेवाडी येथे टेम्पो, कार आणि दुचाकी या तीन वाहनांचा समोरासमोर विचित्र अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविद्र बुतांब्रे,कुनाल काळे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नावे आहेत. तर श्रीकांत काळे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का; ठाण्यातील बाप-लेकानं सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Jintur Crime : आपसी वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्याकाठ्या अन् लोखंडी रॉडने मारहाण, आठ जण जखमी

Maharashtra Live News Update: राहुल पाटील यांचा काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस (AP )मध्ये प्रवेश

Viral Video: ऑफिसला सुट्टी नाही, मग मुलीने केलं नको ते कृत्य, थेट मॅनेजरलाही केला व्हिडीओ कॉल

Ganeshotsav Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दोन दिवशी दारूची दुकाने राहणार बंद

SCROLL FOR NEXT