Balloon Cylinder Blast in Amravati
Balloon Cylinder Blast in Amravati अमर घटारे
महाराष्ट्र

Amravati: फुग्याचा हट्ट ठरला शेवटचा हट्ट; गॅस सिलेंडरच्या स्फोटात २ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती: फुगेवाल्याला (BalloonSeller) पाहून लहान मुलं फुगे घेण्यासाठी पालकांकडे हट्ट करतात. त्यात हवेत उडणारे गॅसचे फुगे तर बालकांना अधिकच आकर्षित करतात. अमरावतीमधील (Amravati) एका चिमुकलीला अशाच फुग्याच्या मोहापायी जीव गमवावा लागला आहे. यात्रेतील फुगेवाल्याकडून गॅसचा फुगा घेत असताना गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट (Blast) झाला, यात चिमुकलीचा पाय हा शरीरापासून वेगळा झाला आहे. या भीषण दुर्घटनेत परी नावाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (Amravati Gas Cylinder Blast)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील ताना पोळ्याच्या यात्रेत परी सागर रोही ही २ वर्षीय चिमुकली आपल्या आजोबांसह गेली होती. यात्रेत गॅसचे फुगे दिसल्याने तिने गॅसचा फुगा घेऊन देण्याचा हट्ट आपल्या आजोबांकडे केला. रंगीबेरंगी फुगे पाहून चिमुकली परी आपल्या आजोबांसोबत फुगे विक्रेत्याजवळ पोहचली. यावेळी फुगे पाहत असताना अचानक फुगेवाल्याजवळ असणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात दोन वर्षीय परीचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला आणि ती गंभीर जखमी झाली.

चिमुकलीला तात्काळ उपचारांसाठी अचलपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र या दोन वर्षीय परीचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला आहे. तिच्या अचानक जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे. या सिलेंडरच्या स्फोटामुळे यात्रेत आलेले अनेकजण जखमी झाले आहेत, तर या स्फोटाने काही घरांना तडे गेले आहे. फुग्याच्या मोहापायी चिमुकलीला जीव गमवावा लागल्याची ही दुर्मिळ घटना आहे. यात्रेतला फुग्यासाठीचा हट्ट हा चिमुकलीचा शेवटचा हट्ट ठरल्याने तिच्या पालकांना दुःख अनावर झाले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT