Wardha News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha: दागिने चमकविण्यास आले अन् दागिने घेऊन पसार झाले; हिंगणघाट येथील घटना

चोरट्यांकडून सोन्याच्या बांगड्या लंपास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास, वर्धा

वर्धा - आम्ही कंपनीतून आलेलो असून तुमच्याकडील चांदीचे व सोन्याचे दागिने चमकावून देतो, असे सांगून घरात आलेल्या अज्ञात दोघांनी महिलेकडील दोन सोन्याच्या बांगड्या चोरुन नेत पळ काढून फसवणूक केली. ही घटना नेहरु वॉर्ड हिंगणघाट (Hinganghat) येथे घडली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुरेश नानप्पा कापसे (८०) व त्यांची पत्नी शोभा हे वयोवृद्ध जोडपे घरी असताना दोन अज्ञात व्यक्ती घरी आले. त्यांनी आम्ही उलाला कंपनीकडून आलो असून सोन्या चांदीचे दागिने साफ करुन चमकावून देतो, असे म्हणत पांढऱ्या रंगाचे पावडर काढून त्यांच्याकडील चांदीच्या समया साफ करुन दिल्या.

तसेच वृद्धेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या काढून लाल रंगाच्या पावडरच्या पाण्यात टाकल्या आणि डब्याचे झाकन बंद करुन थोडावेळ गैसवर गरम करा असे सांगितले. नंतर एका व्यक्तीने बैगमधून नोटबूक काढून त्यावर सुरेश कापसे यांच्या स्वाक्षरी घेतल्या आणि आम्ही साहेबांकडुन पावडर घेऊन येतो, असे सांगून दोघेही घराबाहेर निघाले.

शोभा कापसे यांनी डब्याचे झाकण काढून बघितले असता ५० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरुन नेलेल्या दिसून आल्या. लागलीच त्यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केलीय.आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरवात केलीय.वयोवृद्ध दाम्पत्याची फसवणूक करुन सोन्याच्या बांगड्या चोरुन नेणाऱ्यास लवकरच अटक केली जाईल असं हिंगणघाट पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी येथील शाळेला भीषण आग

घरच्या घरी कसा बनवाल खुसखुशीत मालपुआ, पाहा अगदी सोपी पद्धत

Debit card lost: तुमचं डेबिट कार्ड हरवलंय? लगेच करा ही कामं

TMC-BJP Workers Clash: पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी झाला मोठा राडा; तृणमूल काँग्रेस- भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एकमेकांवर फेकले दगड

भारतीय नागरिकांना महागाईचा दुहेरी धक्का; एलपीजीनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT