two teenagers drown in pond near jalna Saam Tv
महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा खदानीत बुडून मृत्यू, गावावर शाेककळा

two teenagers drown in pond near jalna : दोन्ही शाळकरी मुलांचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याने जालन्यातील हेलस गावावर शाेककळा पसरली.

Siddharth Latkar

- अक्षय शिंदे

जालना येथील मंठा तालुक्यातील हेलस शिवारात खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झालाची दुदैवी घटना घडली. वेदांत गणेश खराबे (वय 13), प्रणव भाऊसाहेब खराबे (वय 13, दोघे राहणार हेलस, ता. मंठा) अशी मृतांची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

गत आठवड्यापासून मंठा आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागातील खदानींमध्ये पाणीसाठा उत्तम झाला आहे. खदानीत पाेहण्याचा आनंद लुटण्यासाठी अबालवृद्ध येत असतात.

हेलस येथील जिल्हा परिषद शाळेतील आठवीत शिकणारे वेदांत खराबे व प्रणव खराबे ही दोन मुलं गावच्या शिवारातील खदानीत पोहण्यासाठी गेले होते. काही वेळानंतर दाेन्ही मुले खदानीत बुडाली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दाेन्ही मुलांच्या मृत्यूने हेलस गावात शाेककळा पसरली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT