Sindhudurg : झुलत्या पुलानजिक पोहण्याच्या मोह आला अंगलट, वेंगुर्ल्यात युवकाचा बुडून मृत्यू, मच्छिमारांनी एकाला वाचवले

सध्या उन्हाळी सुट्टी सुरु असून अनेक पर्यटक या झुलत्या पुलाला भेटी देत असतात. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी सुरक्षा रक्षक तसेच मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांतून होत आहे.
youth passed away in vengurla mandvikhadi near sindhudurg
youth passed away in vengurla mandvikhadi near sindhudurgSaam Digital

- विनायक वंजारे

वेंगुर्ला-मांडवीखाडीत पोहण्यासाठी उतरलेल्या मोरगाव येथील यश भरत देऊलकर (वय 16) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या सोबत पाण्यात उतरलेल्या दुसर्‍या युवकाला खाडीत असलेल्या मच्छिमारांनी वाचवले. या घटनेमुळे माेरगाव परिसरात शाेककळा पसरली आहे. (Maharashtra News)

वेंगुर्ला येथे फिरण्यासाठी युवक गेले असताना त्यांना झुलत्या पूलानजिक असलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे ते दोघे युवक पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.

youth passed away in vengurla mandvikhadi near sindhudurg
Kolhapur: काेल्हापूर जिल्ह्यात गव्यांची दहशत पुन्हा वाढली, राधानगरीसह आज-यात कारला धडक; दाेघे गंभीर जखमी

त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या मच्छिमार बांधवांनी गौरव देवेंद्र राऊळ (वय 15) या मुलाला वाचवले. मात्र, यश भरत देऊलकर पाण्याच्या प्रवाहाबरोबर बुडाला. सध्या त्याचा शोध खाडी पात्रामध्ये सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान खाडी किनारी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या उन्हाळी सुट्टी असून अनेक पर्यटक या झुलत्या पुलाला भेटी देत असतात. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी सुरक्षा रक्षक तसेच मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांतून होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

youth passed away in vengurla mandvikhadi near sindhudurg
IT Raid in Akola : अकाेल्यात आंगडिया कार्यालयावर 'आयकर'ची धाड; नांदेडच्या 'त्या' कारवाईचे धागेदोरे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com