Palghar Accident News Saam TV
महाराष्ट्र

Palghar Accident News: जनावरांसाठी चारा आणायला गेल्या अन् परतल्याच नाहीत; दोन सख्ख्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू

Two Sisters Drowned: डहाणू तालुक्यातील दह्याळे येथे ही घटना घडलीये.

Ruchika Jadhav

Palghar News:

पालघरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा नदीच्या प्रवाहात बुडून मृत्यू झालाय. डहाणू तालुक्यातील दह्याळे येथे ही घटना घडलीये. सदर घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गंगी करबट (वय वर्ष ६० )आणि गुलबी दांडेकर (वय वर्ष ५८) अशी दोन मयत बहिणींची नावे आहेत. एकीचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आलंय तर दुसरी बहीण अजूनही बेपत्ता आहे. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दुसऱ्या बहिणीचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप तिचा शोध लागलेला नाही. जनावरांसाठी चार आणण्यासाठी दोन्ही बहिणी गेल्या होत्या. यावेळी अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे दोघीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळ निवडणुकीत नवा ट्विस्ट, 492 संस्थांच्या पात्रतेला सुप्रीम कोर्टात आव्हान

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खलबतं सुरू

BRICS साठी 2 डझन देश एकत्र; भारताच्या नेतृत्वात झाले 5 मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उद्या दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद

Marathi Actress: गाडी अडवली, पैसे मागितले अन् मारहाण केली...; 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीसोबत पुण्यात धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT