नाशिक : येथील सुरगाणा तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. उंबरठाण येथील राशी येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर काळाने घाला घातला आहे. या दोघी बर्डी येथील गावतळ्यात कपडे धुण्यासाठी गेल्या असता मोठ्या बहिणीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी लहान बहिणीने पाण्यात उडी मारली. परंतु, पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघींचा दु्र्देवी मृत्यू झाला. भूमिका आणि उज्वला नरेश रूत अशी मृतांची नावं आहे. आज सायंकाळी दोघींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (two sisters died because of water drowning in bardi lake)
मिळालेल्या माहितीनुसार, उंबरठाण तालुक्यात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. भूमिका आणि उज्वला अशी मृत पावलेल्या मुलींची नावं आहेत. बर्डी येथील तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या असता या दोघींवर काळाने घाला घातला. पाण्यात बुडालेल्या मोठ्या बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात लहान बहिणीचाही मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.