Chhattisgarh, Naxal, Rajnandgaon saam tv
महाराष्ट्र

Naxal : नक्षलवादी हल्ल्यात दोन पोलिस शहीद, एक जखमी; महाराष्ट्र अलर्ट

राजनांदगावचे पोलीस अधीक्षक अभिषेक मीना यांनी दिली घटनेची माहिती.

अभिजीत घोरमारे

Chhattisgarh : गोंदिया (gondia) व छत्तीसगड बॉर्डरवर आज (साेमवार) पोलिस आणि नक्षलांची चकमक झाली. या नक्षली चकमकीत छत्तीसगड येथील दोन पोलिस (police) शहीद झाले. या घटनेत एक पाेलिस कर्मचारी जखमी झाला आहे. नक्षल्यांनी पाेलिसांची मोटरसायकल देखील जाळली आहे. (Breaking Marathi News)

महाराष्ट्र (maharashtra) - छत्तीसगड (Chhattisgarh) राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत (bortalav police station) आज सकाळच्या सुमारास दहा ते बारा नक्षल्यांनी चहा पाण्यासाठी विनाशस्त्र गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला करुन त्यांना ठार केले.

या घटनेबाबत राजनांदगावचे पोलीस अधीक्षक अभिषेक मीना (Rajnandgaon Superintendent of Police Abhishek Meena) यांनी दिलेल्या माहितीनुसार आज बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्याकरीता पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले हाेते.

त्या परिसरात आधीच दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी दाेघांवर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिसरा कर्मचारी जखमी झाला आहे. नक्षल्यांनी मोटारसायकलला आग लावली. त्यानंतर ते घटनास्थळावरुन पसार झाले आहे. या घटनेनंतर गोंदिया पोलीस व छत्तीसगड पोलीस जंगलात सर्च ऑपरेशन करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT