Nagpur : नागपुरातील घरफाेडी मध्य प्रदेशात उघडकीस, एकास अटक; सक्करदरा पोलिसांची कामगिरी

त्यानंतर नागपुरातून त्याने पळ काढला. मध्य प्रदेशातील दुर्गम भागात जाऊन राहिला.
nagpur , police,  arrests, youth
nagpur , police, arrests, youth Saam Tv

Nagpur : मध्यप्रदेश (madhya pradesh) येथील जेल (jail) मधून फरार होऊन नागपुरात (Nagpur) येऊन घरपोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नागपूरच्या सक्करदरा पोलिसांनी (sakkardara police) अटक (arrest) केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली.

nagpur , police,  arrests, youth
Jejuri : येळकोट येळकोट जय मल्हार... जेजुरी गडावर भंडाऱ्याची मुक्त उधळण; Somvati Amavasya निमित्त लाखाे भाविक दाखल

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगार जेलमधून फरार होता. तो नागपुरात येऊन काही काळ राहिला. या ठिकाणी त्याने मोठी घरफोडी केली. त्यानंतर नागपुरातून त्याने पळ काढला. मध्य प्रदेशातील दुर्गम भागात जाऊन राहिला.

नागपुरात केलेल्या चोरीतून मिळालेल्या पैशातून त्याने अनेक साहित्य घेतलं. उसाचा रस काढणारी मशीन खरेदी करून आपला मध्य प्रदेशात व्यवसाय थाटला. मात्र नागपूरच्या सक्करदरा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास अगदी बारकाईने आणि तांत्रिक पद्धतीने करत त्याचा शोध घेतला.

nagpur , police,  arrests, youth
Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटना बुधवारी उतरणार रस्त्यावर; चक्काजाम आंदाेलनाचा निर्धार

वरिष्ठ पाेलिस निरीक्षक धनंजय पाटील म्हणाले मध्य प्रदेशातील दुर्गम भागात संशयित आराेपी असल्याच्या आमच्या तपासात समाेर आलं. त्यानूसार पोलिसांचे एक पथक तेथे गेले. संशयितास पाेलिसी हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करुन घरफाेडी पैशातून घेतलेला सगळं साहित्य जप्त केले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com