sharad pawar Saam tv
महाराष्ट्र

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांचा गौप्यस्फोट, विधानसभेला १६० जागांची 'त्या' दोघांनी गॅरेंटी दिलेली

sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष शऱद पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती, त्यांनी १६० जागा निवडून आणून देतो, अशी गॅरेंटी दिलेली, असे पवार म्हणाले.

Namdeo Kumbhar

  • विधानसभा निवडणुकीआधी 'त्या' दोन व्यक्तींनी १६० जागांची हमी दिली होती.

  • राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची भेट घडवून आणली गेली.

  • शरद पवार यांनी यात पडू नये असा निर्णय घेतला.

  • या घटनेचा मोठा राजकीय गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला.

Sharad Pawar Reveals Pre-Poll Offer of 160 Seats Guarantee : विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती. त्यांच्याकडून १६० जागा जिंकून देण्याची गॅरेंटी देण्यात आली होती. त्या दोन व्यक्तींची राहुल गांधी यांच्यासोबत भेट घालून दिली होती. त्यावेळी यामध्ये आपण पडायला नको, असे आम्ही ठरवलं, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपानंतर आता शरद पवार यांनी हा गौप्य स्फोट केला आहे. शरद पवार यांच्या गोप्यस्फोटानंतर ती दोन माणसं कोण होती? याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंची युती आणि राहुल गांधींच्या आरोपावर भाष्य केले. राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप संशय घेणारे आहेत. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला मीही उपस्थित होतो. राहुल गांधींच्या आरोपाला आयोगाने उत्तर द्यावे, असे यावेळी शरद पवार म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर बोलताना पवार म्हणाले की यावर आता ठोस बोलताना येणार नाही, आम्ही चर्चा करू

दोन व्यक्ती पवार साहेब यांच्याकडे आल्या होत्या, १६० जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगितले होतं. मतदार यादीत धांदलीसाठी ते दोन व्यक्ती पवार साहेबांकडे आल्या होत्या. पवारानी त्यांना दाद दिली नाही, असे होऊ शकत नाही असे सांगितले. महाराष्ट्रात ७६ लाख मतदार वाढले, शेवटच्या टप्प्यात अनेक टक्के मतदान वाढली. यावर मी सुरुवातीपासून बोलत होतो. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही.
जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गट

आम्ही लोकांनी लक्ष दिलं नाही, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर दोन माणंस माझ्याकड आली होती. महाराष्ट्रामध्ये २८८ जागा आहेत, त्यांनी १६० जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली. त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल शंका येत आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. मी तिथं होतो, ज्यावेळी प्रेझेंटेशन बघत होतो, यावेळी उद्धव ठाकरे सोबत होते. एक गावात, घरात एक व्यक्ती राहत असताना 40 लोकांनी मतदान केले असे अनेक उदाहरण आहेत. निवडणूक आयोगाने लक्ष स्वतंत्र संस्था आहे, यात सखोल जाण्याची गरज आहे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT