Crime News SaamTv
महाराष्ट्र

बसमध्ये चढताना महिलेचे दोन‌ लाखांचे दागिने चोरीला; पंढरपूर बसस्थानकातील घटना

ही चोरीची घटना पंढरपूर येथील बसस्थानकात घडली.

भारत नागणे

पंढरपूर - एटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरांनी मुंबई उच्च न्यायालयातील एका वकिलाच्या पत्नीचे डायमंडसह १ लाख ९० हजार ३०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिन्यांची पर्स हातोहात लंपास केली. ही चोरीची घटना पंढरपूर येथील बसस्थानकात घडली.

याप्रकरणी अॅड. नामदेव मेटकरी यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अॅड. नामदेव मेटकरी आपल्या कुटुंबासह तीन दिवसांपूर्वी आपल्या मुळगावी‌ मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी येथे आले होते.दरम्यान पत्नी शीतल व मुलांना सासुरवाडीला सोडण्यासाठी पंढरपूर बसस्थानकात आले होते.

हे देखील पाहा -

दुपारी २.१० वाजता तुळजापूर - सातारा बसमध्ये पत्नी शीतल व मुले बसली. यादरम्यान, गर्दीत बसमध्ये चढताना चोरट्यांनी शीतल यांच्या मोठ्या पर्समधील दागिने ठेवलेली लहान पर्स हातचलाखीने लंपास केली. त्यामध्ये ठेवलेले ४८ हजार रूपये किंमतीचे कानातील १२ ग्रॅम सोन्याचे टॉप्स, साखळी, वेल , १४ हजारांची एक अंगठी, २४ हजारांची सोन्याची चेन, १हजार २०० रूपयांची चांदीची जोडवी, ६०० रूपयांचे चांदीचे कानातील जोड , १ हजार ५०० रूपयांचा मोबाईल चार्जर, १ हजारांची पर्स आणि १ लाख रूपये रूपये किंमतीचे रिअल डायमंड पेंडेंट व कानातील एक जोड असा एकूण १ लाख ९० हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. पंढरपूर पोलिस या चोरीचा तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

SCROLL FOR NEXT