पत्नीला परीक्षेला सोडलं अन् काळानं गाठलं; दोन दुचाकीच्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू ! अविनाश कानडजे
महाराष्ट्र

पत्नीला परीक्षेला सोडलं अन् काळानं गाठलं; दोन दुचाकींच्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबादः जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील विचित्र अपघातात (Accident) दोघे जण जागीच ठार झाले आहेत. वेगाने धावणाऱ्या दोन दुचाकी परस्परांवर एवढ्या जोरात आदळल्या अन् दोघांना जागीच प्राण गमवावे लागले. औरंगाबादच्या पैठण पाचोड रस्त्यावर डाव्या कालव्याजवळ ही घटना घडली आहे. माहितीनुसार, यातील एक तरुण आपल्या पत्नीला बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सोडून परत निघाला होता. तर दुसरा नातेवाईकांच्या घरी कुंकवाच्या कार्यक्रमावरून गावी परतत होता. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.

दुचाकींचा चक्काचूर;

पैठण- पाचोड रस्त्यावर झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. गोन्ही गाड्या भरधाव वेगात होत्या. यामुळे गाड्या एकमेकांवर आदळताच गाडीवरील नितीन साबळे हे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात सुमारे अडीचशे ते तीनशे फूट लांब जाऊन पडले होते. तर अपघातातील दुसरे जखमी खूप वेगाने जाऊन झाडावर लकटले होते. तर, आणखी एक जण जागीच मृत्यू झाला होता.या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच फौजदार सतीश भोसले, रामकृष्ण सागडे, सुधाकर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अनिरुद्ध शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत त्यांना त्वरित शासकीय रुग्णालयात हलवले. तर जखमीला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात (Ghati Hospital Aurangabad) हलवण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Health Update: मनोज जारांगेंची प्रकृती खालावली, रक्तातील साखरेचे प्रमाण झालं कमी, चालत ही येईना

Maharashtra News Live Updates : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दोन कैदी आपसात भिडले

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

SCROLL FOR NEXT