ATMमध्ये रोकड भरणाऱ्यांनीच केला लाखोंचा अपहार; बुलढाण्यात खळबळजनक प्रकार!

2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकाला अटक
ATM मध्ये रोकड भरणाऱ्यांनीच केला लाखोंचा अपहार; बुलढाण्यात धक्कादायक प्रकरण
ATM मध्ये रोकड भरणाऱ्यांनीच केला लाखोंचा अपहार; बुलढाण्यात धक्कादायक प्रकरणसंजय जाधव
Published On

संजय जाधव

बुलढाणा : विविध बँकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी असलेल्या दोघांनीच साडेपंधरा लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार खामगावमध्ये समोर आला आहे. (Buldhana News)

बुलढाणा जिल्ह्यात एटीएम मध्ये भरण्यासाठी दिलेले 15 लाख रुपये दोघांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात सीएमएस कंपनीच्या शाखा व्यवस्थापकांनी तक्रार दिली. त्‍यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल आकनकर (वय २६, पूरवार गल्ली, शिवाजी आखाडा, खामगाव) आणि गणेश गिऱ्हे (३०, रा. जलंब, ता. शेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

ATM मध्ये रोकड भरणाऱ्यांनीच केला लाखोंचा अपहार; बुलढाण्यात धक्कादायक प्रकरण
Russia-Ukraine War: कीववर हवाई हल्ल्याचा इशारा! नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन

सी एम एस कंपनीद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याचं काम केलं जातं, हे पैसे भरण्यासाठी खामगाव शहरात नियुक्त केलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी या सी एम एस कंपनीलाच तब्बल पंधरा लाखाचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. सीएमएस इन्फोसिस्टम, अकोला या कंपनीत दोघे आरोपी नोकरीला होते.

हे देखील पहा-

कंपनीकडून विदर्भातील राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे काम केले जाते. दोन्ही आरोपींकडे कंपनीने हे काम सोपविले होते. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या विविध बँकेतून रोकड घेऊन ती खामगाव शहरात असलेल्या एटीएममध्ये भरण्याचे काम विशाल आकनकर आणि गणेश गिर्हे करत होते. दोघांना एटीएम मध्ये भरण्यासाठी दिलेले 15 लाख रुपये दोघांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

कंपनीच्या व्यवस्थापकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी तात्काळ या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून एकाला अटक केली आहे. तर दुसरा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com