satara crime news, koyta gang in satara, civil hospital saam tv
महाराष्ट्र

Satara Crime News : सातारा पोलिस ठाण्याजवळ राडा; शिक्षकावर कोयत्याने हल्ला, ट्रक चालकाच्या डाेक्यात घातली फरशी

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

ओंकार कदम

Satara Crime News : सातारा शहरात पुन्हा कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. एकाच रात्रीत झालेल्या दाेन घटनांमध्ये गॅंगमधील एकाने शिक्षकावर (satara teacher) तसेच ट्रक चालकावर हल्ला केला. या हल्ल्यात दाेघे जखमी झाले आहेत. पाेलिसांनी (satara police) काेयता गॅंगच्या एकास ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

सातारा शहरातील शेटे चौक परिसर तसेच पोलीस मुख्यालयाच्या पासून हाकेच्या अंतरावर एका शिक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या घटनेत एका ट्रक चालकाच्या डोक्यात फरशी घालून त्याला गंभीर जखमी करण्यात आले.

यामुळे शहरात रात्रीच्या सुमारास एकच खळबळ माजली. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार या घटनेतील दोन्ही जखमींना सातारा जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कोयता गँगचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर पाेलिसांनी एकास संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे पाेलिस कसून चाैकशी करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT