Accident News saam tv
महाराष्ट्र

Sangli Accident News: सांगलीत तीन जिवलग मित्रांची भरधाव कार उलटली; अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

सांगलीत अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. सांगलीत भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे.

विजय पाटील

Sangli News: सांगलीत अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. सांगलीत भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार उलटून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात जत येळवी मार्गावर भुलेश्वर फाट्याच्या पुढे येळवीजवळ झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीत भरधाव कारचा ताबा सुटल्याने कार उलटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात जत येळवी मार्गावर भुलेश्वर फाट्याच्या पुढे येळवीजवळ झाला आहे. या अपघातातील जखमीस पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे.

दोन मृत व जखमी हे सांगोला तालुक्यातील अभिसेवाडी येथील आहेत. तिघेजण जिवलग मित्र असून ते मुंबईला कंटेनरवर चालक म्हणून कामास आहेत. दगडू शंकर करंडे, सुखदेव खरात अशी मृत झालेल्याची नावे आहेत. तर जखमीमध्ये बापू धोंडीबा शिंदे हे गंभीर जखमी आहे.

तिघे मित्र दिवस सुट्टीवर आले होते. सुखदेव खरात यांच्या पत्नीचे जतमधील एका खासगी रुग्णालयात एक शस्त्रक्रिया झाली होती. तिला पाहण्यासाठी तिघे जण कारने जतला आले होते.

तिला पाहून परत जात असताना घोलेश्वर फाट्याच्या पुढे भरधाव वेगात असलेल्या गाडीचा ताबा सुटल्याने कार तीन चार वेळा उलटली. या झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT