Odisha Train Accident: मालगाडी आणि एक्स्प्रेसची समोरासमोर टक्कर, अपघातात 50 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

Odisha Train Accident: पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील हावडा स्थानकावरून तामिळनाडूतील चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस ओडिशातील बालासोर जिल्ह्यात मालगाडीला धडकली आहे.
Odisha Train Accident
Odisha Train AccidentSaam tv

odisha Train Accident: ओडिशातून अपघाताचं मोठं वृत्त हाती आलं आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील हावडा स्थानकावरून तामिळनाडूतील चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस ओडिशातील बालासोर जिल्ह्यात मालगाडीला धडकली आहे. या अपघातात १७९ जण प्रवासी जखमी झाले आहे. तर ५० प्रवाशांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी सांयकाळी ६:५१ वाजण्याच्या सुमारास कोरोमंडल एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला आहे. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १७९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. दोन्ही गाड्या एकमेकांना धडकल्यानंतर रुळावरून उतरल्या.

Odisha Train Accident
Wrestlers Protest: 'ब्रिजभूषण सिंह यांना 9 जूनपर्यंत अटक करा, नाही तर..' राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा

विशेष मदत आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, अपघातस्थळी बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.

तसेच राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे. या मोठ्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी ५० रुग्णवाहिका पाठवल्या आहेत. जखमींना सोरो सीएचसीमध्ये हलविण्याचे काम सुरू झाले आहे.

या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा- प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणारा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com