Chandrapur Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Chandrapur Accident News: स्पोर्ट्स बाईकवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, दोन मित्रांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा फाट्याजवळ नागपूर-चंद्रपूर महामार्गावर ही घटना घडली.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur Accident News : स्पोर्ट्स बाईकच्या भीषण अपघातात चंद्रपुरातील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. बाईकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा फाट्याजवळ नागपूर-चंद्रपूर महामार्गावर ही घटना घडली. (Accident News)

दोघेही तरुण वरोरा शहरातील रहिवासी होते. हर्षल पाचभाई ( वय २२ वर्ष) आणि अंकुश भडगरे ( वय २३ वर्ष) अशी त्यांची नावं आहेत. दोघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.    (Latest News)

हर्षल आणि अंकुश भद्रावतीला जात होते. चंदनखेड फाट्याजवळ पोलिसांनी नागपूर चंद्रपूर महामार्गावर बॅरिकेड्स उभारले होते. या बॅरिकेड्सला बाईकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही तरूणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अंकुश आणि हर्ष बीएमडब्ल्यू जी ३१० आरआर बाईकवरून प्रवास करत होते. या बाईकची किंमत जवळपास ३ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चौकशी पूर्वीच राणा सूर्यवंशी ने रुग्णालयातून ठोकली धूम

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT