court, gadchiroli, wardha, selu, minor girl saam tv
महाराष्ट्र

Selu : १२ वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी गडचिराेलीतील युवकास दाेन दिवसांची पाेलिस काेठडी

पाेलिसांनी या घटनेचा कसून तपास केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- चेतन व्यास

Wardha News : अल्पवयीन पीडितेवर बळजबरी अत्याचार केल्याची घटना सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली होती. याप्रकरणी सेलू पोलिसांनी (selu) आरोपी नराधमाला गडचिरोली येथून अटक केली. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सूरज कांबळे रा. गडचिरोली (gadchiroli) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Maharashtra News)

१२ वर्षीय अल्पवयीन पीडिता ही घराबाहेर माकडं हकलण्यासाठी निघाली असता सूरजने तिला जवळ बोलावून जबरदस्तीने नजीकच्या शेतात नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. ताे गडचिरोली येथून सेलू तालुक्यात थ्रेशर मशीनवर काम करण्यासाठी आला होता. काम संपल्यानंतर त्याने हे क्रूर कृत्य करून गडचिरोलीला पलायन केले होते.

याप्रकरणी पीडितेच्या जबाबनूसार सेलू पोलिसांनी तक्रार नोंदवून सूरज कांबळेवर गुन्हा दाखल केला. ताे गडचिरोली येथील रहिवासी असल्याने पोलिसांनी याची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली होती. दरम्यान गडचिरोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सेलू पोलिसांना माहिती दिली. (Maharashtra News)

सेलू पोलिसांचे पथक गडचिरोलीत गेले. तेथे राहूल कांबळे यास अटक केली. न्यायालयाने राहूल यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सेलू पोलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई, श्री बालाजी लाडू सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

Dhanteras Horoscope 2026: धनत्रयोदशीला कोणत्या राशींवर होणार लक्ष्मीची कृपा? जाणून घ्या मेष ते मीन राशींचं भविष्य

सरकारकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट! सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू; पहिलं उड्डाण कधी? तिकिटाचे दर अन् वेळापत्रक पाहा

दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ६ सुपरफूड्स; मजबूत हाडांसाठी आजच आहारात समाविष्ट करा

पोटातून गुडगुड आवाज का येतो?

SCROLL FOR NEXT