Pandharpur : पंढरपूरच्या तुळशी वृंदावनातील संत चाेखामेळा मंदिर काेसळलं (पाहा व्हिडीओ)

या घटनेमुळे भाविकांत नाराजी पसरली आहे.
Pandharpur
Pandharpursaam tv
Published On

Pandharpur : पंढरपूर येथील प्रसिद्ध तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा (Sant Chokhamela) यांचे संगमरवरी मंदिर कोसळलं. वा-यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती वन विभागाने दिली. (Breaking Marathi News)

Pandharpur
Pandharpur News : 'या' प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी टाकळी ते मुंबई लाॅंगमार्च

तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जानेवारी 2019 मध्ये झाले होते या मंदिराचे लोकार्पण. तुळशी वृंदावनाच्या निमित्त राज्य सरकारने (maharashtra government) कोट्यावधींचा खर्च केला हाेता.

Pandharpur
Satara News: झुकेगा नहीं साला ! डायलॉगबाजीने तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या उदयनराजेंच्या भूमिकेकडे लागलं लक्ष

चार वर्षांतच मंदिर पडल्याने इतर संतांच्या मंदिरांना धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे. या तुळशी वृदांवनाचे काम निकृष्ट झाल्याचे आज उघड झाले असेही बाेलले जात आहे. दरम्यान पंढरपूर येथील प्रसिद्ध तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा यांचे मंदिर कोसळल्याने या मंदिरातील संत चाेखामेळा यांच्या मूर्तीचे देखील माेठं नुकसान झालं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com