Nagar : नगर जिल्हा बॅंक अध्यक्षपद निवडणूक; अखेरच्या क्षणी भाजपने 'मविआ'चे मनसुबे उधळून लावले, एक मताने बाजी

आता निकालाकडे नगरवासियांचे लक्ष लागले हाेते.
Nagar DCC Bank
Nagar DCC Banksaam tv

- सुशिल थाेरात

Nagar DCC Bank : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (District Central Cooperative Bank) अध्यक्षपदाची आज निवड हाेणार आहे. या निवडीसाठी आज (बुधवार) सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची विशेष सभा आयोजिण्यात आली आली आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule) यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर हाेते. (Breaking Marathi News)

Nagar DCC Bank
Satara : सातारा जिल्हा हादरला; महिलेची निर्घृण हत्या करून दागिने लुटले, पाेलिस तपास सुरु

मविआने (mva) एकमताने चंद्रशेखर घुलेंची अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केल्याने त्यांनी अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्जही भरला. अर्ज भरण्याच्या अखेरच्या मिनिटाला भाजपच्या वतीने अचानकपणे माजी आमदार शिवाजी कर्डिले (shivajirao kardile) यांचा देखील अर्ज आला.

Nagar DCC Bank
Bachchu Kadu News : बच्चू कडूंना २ वर्षांची शिक्षा; नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

त्यामुळे या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला. एकीकडे चंद्रशेखर घुले यांचा एकच अर्ज आला असल्यामुळे त्यांचा निवडीचा जल्लोष सोशल मीडियावर सुरू हाेता. अचानक भाजपच्या वतीने अर्ज आल्याने आता काेण बाजी मारणार याकडे नगरवासियांचे लक्ष लागून राहिलं हाेते.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान घेतले. या मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांना नऊ मते मिळाली. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना दहा मते मिळाली. एक मतदार तटस्थ राहिल्याने या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com