two crore ram naam chanting booklets will sent to ayodhya from nandurbar  saam tv
महाराष्ट्र

Ayodhya Ram Mandir: सव्वा दोन कोटी रामनाम जप पुस्तिका पाठविल्या जाणार अयोध्येला, नंदनगरीतील नागरिकांचा उपक्रम

नंदनगरीतून राम मंदिर लोकार्पण साठी एक वेगळ्या प्रकारची भेट ठरणार आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण (ram mandir inauguration) सोहळ्याला नंदुरबार (nandurbar) जिल्ह्यातून सव्वादोन कोटी रामनाम (ram naam chanting) जपची भेट दिली जाणार आहे. दाेन हजार सातशे पुस्तिका आणि चार हजार पेपरचा वापर करत सव्वा दोन कोटी रामनामचे लिखाण करण्यात आले आहे. हे सर्व अयोध्येत पाठविले जाणार आहे. (Maharashtra News)

अयोध्या येथील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या भारतीयांना लागली आहे. त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळतयं.

येत्या 17 जानेवारी पासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसेच 22 जानेवारीला या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. या भव्य लोकार्पण सोहळ्याला नंदुरबार जिल्ह्यातून एक दोन नव्हे तर तब्बल सव्वा दोन कोटी रामनाम जपचे पुस्तिका अयोध्येला जाणार आहेत.

नंदुरबार शहरात राहणारे भरत लोहार यांनी गणेशोत्सवा (ganeshotsav) दरम्यान रामनाम लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला प्रतिसाद देत नंदनगरीतील अनेक कुटुंबियांनी आपल्याकडे असलेल्या पुस्तिका पेपर आणि वाह्यावर लेखणीने राम नाम कोरले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या 2700 पुस्तिका आणि 4 हजाराहून अधिक पेपरचा यात वापर करण्यात आला आहे. वह्या पुस्तकांवर लिहिलेल्या या सव्वा दोन कोटी रामनाम कोरलेल्या पुस्तके आता थेट अयोध्यात होणाऱ्या भगवान श्रीराम यांच्या मंदिर लोकार्पण सोहळ्याला पोहोचवण्यात येणार आहेत.

वह्या पुस्तकांवर कोरलेल्या रामनामच्या या पुस्तिका आता 25 तारखेला अयोध्येत पोहोचणार आहेत. नंदनगरीतून राम मंदिर लोकार्पण साठी एक वेगळ्या प्रकारची भेट ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT