Nagpur Nitin Gadkari Case saam tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

nitin gadkari threat case accused sentenced : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडं १०० कोटींची खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांना पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

Nandkumar Joshi

पराग ढोबळे, नागपूर | साम टीव्ही

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याकडे १०० कोटी रुपयांची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूर न्यायालयानं दोन आरोपींना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

जयेश पुजारी आणि अफसर पाशा अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी नितीन गडकरींकडे १०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. १४ जानेवारी आणि त्याच्या दोन महिन्यांनी म्हणजेच २१ मार्च रोजी गडकरी यांच्या कार्यालयामध्ये जीवे मारण्याच्या धमकीचे फोन केले होते. हे दोन्ही फोन कर्नाटकातील तुरुंगातून केले होते, असे तपासात स्पष्ट झाले होते. या दोन्ही आरोपींना यूएपीएसह अनेक गंभीर कलमांखाली दोषी ठरवण्यात आले होते.

नितीन गडकरी खंडणी आणि धमकी प्रकरणात तपास केल्यानंतर बेंगळुरू कनेक्शन समोर आले होते. त्यानुसार, नागपूर पोलिसांनी २८ मार्चला बेंगळुरूच्या तुरुंगातून जयेशला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला नागपुरात आणले. त्याची चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली होती. लश्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि पीएफआय यांसारख्या दहशतवादी संघटनांशी त्यांचे कनेक्शन असल्याचे उघड झाले. त्यांच्याविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हे नोंदवले होते.

जयेश पुजारी आणि पाशा या दोघांना न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर कलम ५०७ अंतर्गत दाखल गुन्ह्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड भरला नाही तर १० महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाकडून एकूण ६५ साक्षीदार तपासण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

SCROLL FOR NEXT