भरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडले; अपघातानंतर ट्रकला लागली आग! SaamTvNews
महाराष्ट्र

भरधाव ट्रकने दोन बालकांना चिरडले; अपघातानंतर ट्रकला लागली आग!

या घटनेत आरोही नकुल सोनार वय 5 वर्ष, पायल भालचंद्र वारघडे वय 9 वर्षे या दोन्ही मुली जागीच ठार झाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- फैयाज शेख

पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील नाशिक-जव्हार महामार्गावर असलेल्या मोरचोंडी येथे आज दुपारी एका भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली, यात दोन बालक चिरडले गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, चालकाने घाईघाईने ट्रक पुन्हा मागे घेतला एक जण गंभीर जखमी झाला, तर तेथील एका दुकानाला सुद्धा धडक दिली यात दुकानाचे पत्रे तुटले असून, मोठे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा :

मोरचोंडी गावाशेजारूनच नाशिक-जव्हार महामार्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी भरधाव वाहने ये-जा करत असतात. आज दुपारी 3.17 मिनिटांनी जव्हारहून नाशिकच्या दिशेने एक ट्रक भरधाव वेगाने चालला होता. नशेत असलेल्या ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने विरुद्ध दिशेने तेथे खेळत असलेल्या बालकांना तथा प्रवाश्यांना चिरडत झाडाला धडक दिली.

या घटनेत आरोही नकुल सोनार वय 5 वर्ष, पायल भालचंद्र वारघडे वय 9 वर्षे या दोन्ही मुली जागीच ठार झाल्या आहेत. तर एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून, त्याला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोखाडा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा निषेध नोंदवता स्थानिकांनी रस्ता रोको सुरू केला आहे. दरम्यान, या अपघातानंतर वाहने शेरीचापाडा मार्गे वळविण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

Amboli Tourism : आंबोलीजवळ असलेला छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT