Tulja Bhavani Mandir Saam tv
महाराष्ट्र

भवानीच्या दर्शनासाठी भाविकांची लूट; बोगस पुजारी आणि एजंटांचा भाविकांना गंडा

tulja bhavani temple pujari : आता पाहूयात बातमी साम टीव्हीच्या इन्व्हेस्टीगेशनची....तुळजाभवानी मंदिरात बोगस पुजारी आणि एजंटकडून भाविकांची खुलेआम लूट सुरु असल्याचा साम टिव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश झालाय. दर्शनासाठी भाविकांची कशी फसवणुक केली जाते ? या रॅकेटमध्ये कोणाकोणाचं साटंलोटं आहे...पाहूयात साम इन्व्हेस्टिगेशनचा हा रिपोर्ट.......

Suprim Maskar

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी दररोज लाखो भाविक मोठ्या श्रद्धेनं लीन होतात...मात्र पवित्र मंदिराच्या परिसरात काही लुटारूंनी श्रद्धेचा बाजार मांडलाय...भवानीच्या दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांची बोगस पुजारी आणि एजंटांकडून सर्रास लूट केली जातेय...याच लुटारुंचा साम टीव्हीनं केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये पर्दाफाश झालाय...

विशेष म्हणजे, पैसे घेतल्यानंतर हे एजंट भाविकांना कुठल्याही विशेष मार्गाने न नेता... विनाशुल्क असलेल्या 'मुख दर्शन' रांगेत ढकलून देतात.. त्यात साम टिव्हीच्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान संशय आल्यानं या लुटारू पुजाऱ्यानं पूजा केली तर दर्शन फ्री असल्याची सारवासारव केली. एजंट आणि बोगस पुजाऱ्याचं हे रॅकेट असून प्रत्येक भाविकाकडून दर्शनासाठी 100 रुपये उकळले जातात. दिवसभरात अशा शेकडो भाविकांना गंडा घालण्यात येतो. आणि यातून दररोज हजारो रुपयांची लूट होत असते.

या प्रकारामुळे केवळ भाविकांचीच लूट होत नसून, आई तुळजाभवानीचे अधिकृत पुजाऱ्यांची देखील बदनामी होतेय... त्यामुळे पुजारी मंडळाने या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत... बोगस पुजाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी केलीय...

एकीकडे मंदिराच्या आवारात एवढा मोठा गोरखधंदा उघडपणे सुरू असताना, तुळजाभवानी मंदिर संस्थान काय करत आहे? असा सवाल आता उपस्थित होतोय...या संपूर्ण रॅकेटबाबत 'साम टीव्ही'ने मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, "बोगस पुजारी आणि एजंटांवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही विशेष पथक नियुक्त केले आहे," असे मोघम उत्तर प्रशासनाकडून देण्यात आलं. मात्र, या गंभीर विषयावर कॅमेऱ्यासमोर येऊन अधिकृत भूमिका मांडण्यास प्रशासकीय अधिकार्‍यांनी स्पष्टपणे टाळाटाळ केली. मात्र साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यामुळे आता तरी प्रशासन आणि तुळजाभवानी संस्थान भाविकांची लूट कायमची थांबवणार का? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT