

खरेदी केंद्र नसलेल्या तालुक्यात नाफेड थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करणार
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
कांदा खरेदीतील जाचक अटी आणि निकष शिथिल केल्यानंतर कांदा खरेदी संदर्भात महत्त्वाचा निर्णय
नाफेडचे खरेदी केंद्र नसलेल्या ठिकाणी थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करण्यास परवानगी
कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या शिरोली जकात नाक्याजवळ आज सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्यावरील संरक्षक कठडे तोडत थेट सुमारे ३० फूट खोल उतारात कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सायंकाळी सहाच्या सुमारास शिरोली जकात नाका परिसरात घडला. तावडे हॉटेल चौकातून बाजार करून परत येत असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहनाचा ताबा सुटला.
पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातील चौघे चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.
सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान गँगस्टरच्या संपर्कात असल्याची माहिती
गेल्या 10 तासंपासून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संशयित तरुणांची चौकशी सुरू...
चौकशी दरम्यान एटीएस पथकाकडून कमालीची गुप्तता.
परभणीच्या सोनपेठ येथे राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील अटी-शर्थींच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या कर्जमाफीसंदर्भातील अध्यादेशाची होळी करण्यात आली. तसेच गाढवाला शाल, टोपी , हार घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक निषेध करण्यात आला.
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान दोन दिवस खाद्य पदार्थ विक्री व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे. गॅस, चुल पेटवल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त करीत महाड प्रांताधिकारी यांनी बंदीचे आदेश जारी केले आहेत. या प्रकरणी किल्ले रायगडावरील व्यवसायीकांनी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेतली. त्यांना बाजू समाजावून सांगत बंदी आदेश मागे घेण्याची विनंती केली. बंदी कायम ठेवली, स्थानिकांना त्रास झाला तर आंदोलनाचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
जूनच्या पहिल्या आठवड्यात सातपुड्यात पावसाची एन्ट्री झाली आहे.
मुसळधार पावसामुळे सातपुड्यातील नद्यांना पूर आला आहे.
धडगाव तालुक्यातील काकडदा, मांडवी परिसरात दमदार पाऊस
अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा...
नाशिक -
- नाशिक विधानपरिषद निवडणुकीत घडामोडींना वेग
- अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना भेटीसाठी उदय सामंत यांचा फोनवरुन निरोप
- गोकुळ गीते उदय सामंत यांची भेट घेणार की नाही ? हे मात्र अद्याप अस्पष्ट
- गोकुळ गीते यांचं शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना आहे मोठे आव्हान
- गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी मंत्री उदय सामंत प्रयत्नशील
- गोकुळ गिते आणि गणेश गिते दोघेही निवडणूक लढवण्यावर ठाम
नाशिक -
नाशिकच्या कळवण तालुक्यात तुफान पाऊस
काही भागात जोरदार वादळी वारा, विजांचा गडगडाट आणि गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली
अचानक आलेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली
गारांचा पाऊस, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या टोमॅटो, मिरची पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सातारा -रहिमतपूर रस्त्यावर कारला भीषण अपघात
अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू
अपघातामध्ये २ जण गंभीर जखमी झाले
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
पुण्यातील दौंड तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरांकडून केली जातेय गर्भलिंग निदान चाचणी
यवत पोलीस स्टेशनहद्दीत बोगस डॉक्टरकडून चालवण्यात येते गर्भलिंग निदान केंद्र
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद
ऐतिहासिक वारसा असलेल्या बदलापूर गाव तलावात अक्षरश: घाणीचं साम्राज्य पसरलंय. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून प्लास्टिकच्या पिशव्याचा खच पडलाय. त्यामुळे दुर्गंधी पसरून इथल्या रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय.
बदलापूर पश्चिमेकडे गाव परिसरात जुना तलाव असून कमळांचा तलाव म्हणून तो प्रसिद्ध होता. मात्र गेल्या काही वर्षात या तलावाची अवस्था अत्यंत बिकट झालीय. तलावात जलपर्णी वाढली असून सांडपाण्यामुळे तलावातील पाणी दुषित झालंय. काही समाजकंटक तलावात कचरा टाकत असल्यामुळे घाणीचं साम्राज्य वाढलंय. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचं प्रमाणही वाढलंय. एकीकाळी बदलापूरकरांच्या पर्यटनाचं ठिकाण असलेला हाच तलाव आता इथल्या रहिवाशांचं आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतोय. पालिकेच्या दुर्लक्षामुळे तलावभोवतीचे संरक्षक कठडेही गायब झाले आहेत. बदलापूरचं वैभव असलेला गाव तलाव नामशेष होत चालल्यानं नागरिकांमधून संतापाची लाट उसळलीय.
मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. मेघराजराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेल आणि माजी अध्यक्ष विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, आनंद काळे यांच्या चित्रकर्मी पॅनेलमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.
जिल्ह्यातील 7 कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, तर 3 जणांचे परवाने निलंबित, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात कृषि निविष्ठा विक्रीत अनियमितता आढळल्याने मोठी कारवाई, तपासणी आणि सुनावणीअंती 7 कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी झाले रद्द. त्याचप्रमाणे 3 केंद्रांचे परवाने 2 महिन्यासाठी निलंबित. तर इतर 6 केंद्रांना त्रुटीं बाबत दिली सक्त ताकीद. या कारवाईमुळे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या केंद्रचालकांमध्ये मोठी खळबळ.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जेष्ठ वद्य सप्तमी, मंगळवार दिनांक ७ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिरातून संत तुकाराम महाराजांची पालखी भक्ती, श्रद्धा आणि तुकोबाचा नामस्मरणाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच पालखी रथ आणि चौघडा गाडीसाठी संस्थानतर्फे तीन बैलजोड्या खरेदी करण्यात आल्या असून त्या यंदाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत....
मलकापूर शहरातील तुलसी नगर, शिवशक्ती नगर, नालंदा नगर व वृंदावन नगर परिसरात दरवर्षी पावसाचे पाणी घरांमध्ये शिरत असल्याने नाल्यांचे तातडीने खोलीकरण करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व ग्रामस्थांनी बोदवड चौफुलीजवळ रास्ता रोको आंदोलन केले. उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे बुलढाणा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. तहसीलदारांनी आंदोलकांची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे निर्देश दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र,
भिवंडी शहराच्या सीमेवरून जाणाऱ्या दिवा वसई या रेल्वे लाईन वर अंजुरफाटा परिसरात राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत लक्ष्मण नगर ही झोपडपट्टी बसली असून मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारी या झोपडपट्टीवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करीत जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.लक्ष्मण नगर या झोपडपट्टीत २५८ झोपड्या मागील ३० वर्षांपासून होत्या.त्यांच्या झोपड्यांना घटनांवर दिल्यानंतर स्थानिक राहनाळ ग्रामपंचायतीने दिवाबत्ती, पिण्याचे पाणी या नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.एक अंगणवाडी सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आली होती
वाशिम जिल्ह्यात अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी धडक मोहीम राबवली असून गेल्या ५ दिवसांत तब्बल ७८ ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. या कारवाईत देशी, विदेशी आणि गावठी दारूसह एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,अनेक आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात कुठेही अवैध दारू विक्री सुरू असल्यास नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कल्याण ग्रामीणमधील खोणी गावात दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश हा गैरसमजातून झाल्याचा दावा करत संबंधित कार्यकर्त्यांनी मनसेत पुनरागमन केले.
गोपाळगड वादानंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अधिक सतर्क; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची किल्ल्याला भेट
गोपाळगड किल्ल्याच्या मालकीच्या दाव्यानंतर निर्माण झालेल्या वादाची राज्यभर चर्चा
इम्तियाज मणियार यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
वादाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाची गोपाळगडवर विशेष स्वच्छता मोहीम
राजधानी दिल्लीतील मालवीय नगरमध्ये आगीची (Fire) भीषण घटना घडली असून एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत होरपळून 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दिल्लीतील लेमन ग्रीन (Lomon green hotel) नावाच्या रेस्टॉरंटमध्ये बुधवार सकाळी 9.45 वाजता आग लागल्याची घटना घडली.
सोलापूर काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपुरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आदित्य पत्तेपूरकर यांनी दिली आहे. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही केलेल्या नागेश भोसले यांनी सही बनावट असल्याची हरकत घेतली होती. त्यानंतर फत्तेपुरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दात मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एक पेड बाप के नाम गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठा संकल्प
गोपीनाथ मुंडे यांची शपथ घेऊन सांगते तुमच्या एवढे मला प्रेम कोणीही दिले नाही मंत्री पंकजा मुंडे जनतेसमोर नतमस्तक
गोपीनाथ गडावर केंद्र अथवा राज्य सर्वच मंत्री येऊन गेले आहेत असे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब होते
राज्याभिषेक परवानगीवरून मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांवर हल्लाबोल
6 जून रोजी तुळजाभवानी मंदिरात शिवराज्याभिषेक करण्यास परवानगी देण्याची मागणी
भंडारा शहरात आज केंद्र सरकारच्या इंधन आणि एलपीजी दरवाढीच्या धोरणांविरोधात संतापाची लाट पाहायला मिळाली. दर आठ दिवसांनी होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली असून, याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज भंडारा येथील त्रिमूर्ती चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
- वारंवार पडलेले बाजार भाव, निर्यात बंदी, निसर्गाचा असमतोल यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात..
- कांद्याला हमी भाव द्यावा, निर्याद बंदी उठवावी, अवकाळी पाऊस, गारपीट मुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आलेले अनुदान खात्यावर वर्ग करावे,कांदा पिक पाहणी - कापणी प्रयोगाची चौकशी करावी..
- शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ व्हावा..
- नाफेड मार्फत प्रतिक्विंटल ३००० रुपये प्रतिक्विंटल भावाने सरकारने खरेदी करावी..
- आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी..
धुळे शहरामध्ये गोरक्षक समितीच्या वतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बकरी ईदच्या दिवशी गोवंशाचे अवशेषाची विल्हेवाट महापालिकेच्या वतीने लावण्यात आली असल्याचा आरोप यावेळी गोरक्षक समितीच्या वतीने लावण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते
सांगली-मिरज शहरासह जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सांगलीकर उकाड्याने हैराण झाले होते.
११ वाजल्यानंतर ढगाळ वातावरण होऊन पावसाने दमदार हजेरी लावली. सांगली व मिरज शहरासह परिसरात मुसळधार असा पाऊस पडला आहे.
सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भाग व रस्त्यावर पाणी साचले.तर अचानक पडलेल्या पावसामुळे सांगलीकरांची मात्र पुरतीच दैना उडाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सावंतवाडी, कुडाळसह जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून ठिकठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊसही सुरू झाला आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना संघटना बूथस्तरापर्यंत सक्षम करण्यासाठी शिवसेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ५ जून रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यानिमित्त सकाळी तळोदा शहरात शहादा-तळोदा आणि अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदारसंघाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अहिल्यानगरमध्ये तिसगाव-शेवगाव मार्गावर वृद्धेश्वर कारखाना परिसरात एसटीचा भीषण अपघात...
एसटी बस चे टायर निखळल्या मुळे एसटी बस रोड सोडून खड्ड्यात गेली...
प्रवाशांनी अनुभवला मृत्यूचा थरार..
एसटीची दोन्ही चाके तुटली!10 प्रवासी जखमी भीषण अपघाताने उडाली खळबळ, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल..
सुदैवाने अद्याप कोणती जीवितहानी नाही...
- शिंदे शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून
- गीते बंधूंच्या माघारीसाठी सामंत नाशिकमध्ये तर गीते बंधू मात्र नाशिकमधून गायब
- गीते बंधूंच्या माघारीसाठी शिंदे सेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू
- शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख उदय सामंत यांच्याकडून गीते बंधूंना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू
- आमचा पहिला नंबरचा शत्रू शिंदेसेना, संजय राऊतांचं सूचक विधान
- शिंदेसेनेला रोखणं मोठं आव्हान नाही, तो केवळ पैशाचा फोर्स आहे
- संजय राऊत यांच्या विधानाने पुन्हा नाशिक विधान परिषद चर्चेत
- १८ तारखेला सकाळी ८ आमच्या नगरसेवकांना आदेश दिले जातील
- नाशिकमध्ये ठाकरेंचे नगरसेवक भाजप बंडखोराला मदत करणार का? याकडे लक्ष
* मंदिरात आलेला एक भाविक देखील जखमी
* पालिका प्रशासनाने वेळेवर धोकादायक वाडा न उतरवल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप
* मंदिराभोवतीच्या जुन्या वाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत
पाचगाव आणि दिंडनेर्ली गावातील तरुण परस्परांना भिडले
एकमेकांना जबर मारहाण, गाड्यांची ही तोडफोड
मारहाणीसाठी एडक्याचाही वापर झाल्याची माहिती
वादाच कारण अस्पष्ट, रविवारी रात्रीची घटना
सकाळपासून अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची हजेरी
जिल्ह्यात पुढचे चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचा इशारा
6 तारखेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट
काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपुरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आदित्य पत्तेपूरकर यांनी दिली आहे.
सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सुचक म्हणून सही केलेल्या नागेश भोसले यांनी सही बनावट असल्याची हरकत घेतली होती. त्यानंतर फत्तेपुरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दात मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वेंगुर्ले येथील शिरोडा-वेळागर समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक खोल पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली. प्रणव देवमाने (गडहिंग्लज) असे समुद्रात बुडालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, त्याच्यासोबत असलेला दुसरा पर्यटक सुदैवाने पोहून पाण्याबाहेर आल्याने त्याचा जीव वाचला आहे. कोल्हापूर गडहिंग्लज येथून हे पर्यटक शिरोडा वेळागर येथे फिरण्यासाठी आले होते. सायंकाळच्या सुमारास दोन्ही पर्यटक समुद्रात आंघोळीचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले होते.
भुसावळच्या व्हीआयपी सिटी कॉलनीत छतावर झोपलेल्या जोडप्यावर सहा जणांनी लोखंडी रॉड, चॉपर, हॉकी स्टिक व काठ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या हल्ल्यात मंगेश काळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचावासाठी छतावरून उडी मारूनही आरोपींनी पाठलाग करून पुन्हा मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
शिक्षणाच्या क्षेत्रात भंडारा जिल्ह्याने पुन्हा एकदा आपली मान उंचावली आहे. भंडारा शहराची रहिवासी असलेल्या नमीरा सिद्दिकी हिने देशातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी NEET MDS परीक्षा उत्तीर्ण करत 'ऑल इंडिया रँक १' पटकावला आहे. नमीराने आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर हे उत्तुंग यश संपादन केले असून, तिने संपूर्ण देशात भंडारा जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नमीराच्या या यशाने अनेक विद्यार्थ्यांसाठी एक नवी प्रेरणा निर्माण केली आहे.
नाशिकच्या चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर दुपारी एसटी बस ला आग लागल्याची घटना ताजी असताना संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एक मोठा अपघात घडला असून राहुड घाट उतरत असताना क्रेनचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव जाणाऱ्या क्रेनने समोरील चार वाहनांना धडक दिली. या भीषण दुर्घटनेत एका कार मधील ऐका लहान मुलासह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे,क्रेन ने आयशर गाडी,कार, आपे रिक्षा यांना धडक दिली,तर आपे रिक्षा क्रेन च्या पुढील भागात अडकून तिचा चक्काचूर झाला,अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी रिक्षा मध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढले.अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.चांदवड पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.