IAS Tukaram Mundhe Saam TV
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंची नियुक्ती रखडली? बड्या अधिकाऱ्याची अचानक बदली रद्द, अचानक नेमकं काय घडलं?

IAS Tukaram mundhe : तुकाराम मुंढेंची नियुक्ती रखडल्याचे समोर आलं आहे. कारण बड्या अधिकाऱ्याची अचानक बदली रद्द झाल्याने त्यांची नियुक्ती रखडल्याचे सांगण्यात येत आहे.

Vishal Gangurde

तुकाराम मुंढे यांची नियुक्ती रखडल्याचे समोर येत आहे

आपत्ती व्यवस्थापन विभागात IAS सिंघल यांची बदली कायम

तुकाराम मुंढे यांची नियुक्ती रखडल्याने प्रशासकीय चर्चांना उधाण

राज्यात काही दिवसांपूर्वी अनेक बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होता. यात IAS तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही समावेश होता. मुंढे यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर सनदी अधिकारी विनिती वैद सिंघल यांची बदली ही मृद व जलसंधारण विभागात करण्यात आली होती.

'सरकारनामा'च्या वृत्तानुसार, IAS सिंघल यांची बदली रद्द करण्यात आली आहे. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन विभागाच्या सचिवपदी कायम ठेवण्यात आलं आहे. खरंतर सिंघल यांची पाच महिन्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली होती. आता त्यांची बदली रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सिंघल यांची बदली रद्द झाल्याने तुकाराम मुंढे हे नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांच्या आईचं निधन झालं होतं. त्यामुळे ते तातडीने रजेवर गेले होते. तुकाराम मुंढे हे पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या कर्तव्यावर होते. पण त्यांच्या आईच्या निधनाची वार्ता कळताच तातडीने घरी परतले. त्यांच्यावर आईवर बीड जिल्ह्यात त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पुन्हा कर्त्यव्यावर जाण्याच्या वेळी नियुक्ती रखडल्याने अद्याप त्यांनी कार्यभार घेतलेला नाही.

तत्पूर्वी, तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग विभागात अनेक मोठे निर्णय घेतले होते. दिव्यांग विभागातील पदाचा कार्यभार घेऊन काही दिवस होताच त्यांची बदली झाली. आता मुंढे यांची कोणत्या विभागात बदली होणार, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची कोणत्या विभागात नियुक्ती होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT