Trupti Desai Saam Tv
महाराष्ट्र

Trupti Desai: 'अखेर "कोरोनाने" मला गाठलचं', फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांना देखील करोनाची लागण झाली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) करत याबाबतची माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Trupti Desai Corona Positive)

या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील कलाकार तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांना देखील करोनाची लागण झाली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) करत याबाबतची माहिती दिली आहे.

हे देखील पहा -

त्या म्हणल्या की, अखेर "कोरोनाने" मला गाठलचं माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, चाहत्यांची भेटायला गर्दी परंतु नियमांचे पालन मी करीत होते. जेंव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही. माझी तब्येत व्यवस्थित आहे ,काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा असे आवाहन तृप्ती देसाई यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: 'सर्वांची आई मरते, नाटक करू नको कामावर ये', सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर बॉस भडकला, ई-मेलचे फोटो व्हायरल

तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले; गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली|VIDEO

Maharashtra Live News Update:पुणे नाशिक महामार्गावरील भिमा नदीच्या पुलावर भिषण अपघात

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT