truck driver strike affects ratnagiri shortage of fuel on at petrol pump  saam tv
महाराष्ट्र

Petrol Diesel Tanker Drivers Strike: भटकंतीस आलेल्या पर्यटकांची पेट्रोल- डिझेलसाठी काेकणात भ्रमंती

यामुळे वाहनांच्या लांबच लाब रांगा पेट्रोल पंपावर हाेत्या.

अमोल कलये

Ratnagiri News :

नव्या हिट अँड रन कायद्याच्या (New Hit And Run Law) विराेधात आजही (मंगळवार) राज्यभरात ट्रक चालकांचा संप (truck driver strike) सुरु आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण हाेईल अशी भीती व्यक्त केली गेली. काेकणात देखील पर्यटक इंधनासाठी पेट्राेल पंपावर वाहनांच्या रांगा लावून हाेते. (Maharashtra News)

टँकर चालकांच्या संपामुळे रत्नागिरीत डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे वाहनांच्या लांबच लाब रांगा पेट्रोल पंपावर हाेत्या.

बहुतांश ठिकाणी वाहनचालक हे रांगेत उभे राहून दुचाकी आणि चार चाकीत पेट्रोल आणि डिझेल भरताना दिसत हाेते. या संपाचा सर्वाधिक फटका हा कोकणात आलेल्या पर्यटकांना बसला. तासमतास रांगेत उभे राहून त्यांना पेट्रोल आणि डिझेल भरावे लागले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्याहून गाेव्याला गेलेल्या पर्यटकांनी काेकणातील त्यांचे पुढचे प्लॅन रद्द केल्याची माहिती साम टीव्हीशी बाेलताना दिली. पर्यटक म्हणाले इंधन भरण्यातच जादा वेळ गेला आहे. त्यामुळे पुढचा सगळा प्लॅन ठप्प झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

SCROLL FOR NEXT