Bhandara Accident News saam tv
महाराष्ट्र

Bhandara : चाकं निखळल्यानं डंपर थेट दवाखान्यात घुसला, खापातील चालकावर गुन्हा दाखल

पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

अभिजीत घोरमारे

Bhandara News : भंडारा (bhandara) जिल्ह्यातील तुमसर येथे भरधाव टिप्पर दवाखान्यात (hospital) शिरल्याची घटना घडली. या टिप्परचे चाक निखळल्याने हा अपघात (accident) झाला. रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात प्राणहानी झालेली नाही. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार भंडारा जिल्हाच्या तुमसर मार्गे भंडाराकडे रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परची समोरची दोन्ही चाके निखळल्याने थेट रुग्णालयाच्या भिंतीला टिप्परने धडक दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली.

मध्यप्रदेशातून आला हाेता टिप्पर

मध्यप्रदेशातून रेती भरून टिप्पर भंडाराकडे निघाला हाेता अशी माहिती पाेलिसांनी दिली. डॉ. मधुसूदन गादेवार यांच्या रुग्णालयाच्या भिंतीला टिप्परने धडक दिली. यात भिंतीजवळील एक वृक्ष उन्मळून पडला.

चालकावर गुन्हा दाखल

या अपघाताची माहिती होताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेतील टिप्पर चालक निखिल ठवकर (राहणार खापा) याच्यावर तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boiled Egg vs Omelette: उकडलेली अंडी की ऑम्लेट? आरोग्यासाठी चांगलं काय?

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

SCROLL FOR NEXT