Ratnagiri, Rajapur, Leopard saam tv
महाराष्ट्र

Trimbakeshwar News : ४ निष्पाप बालकांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला ठार करणार? वनविभागाने मागितली परवानगी

leopard In Trimbakeshwar : मागील ५ ते ६ महिन्यात या बिबट्यानं ४ निष्पाप बालकांचा बळी घेतलाय. मात्र हा बिबट्या हाती लागत नसल्याने अखेर त्याला ठार करण्याची परवानगी मागितली आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik News: नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याची परवानगी वनविभागाने मागितली आहे. मागील ५ ते ६ महिन्यात या बिबट्यानं ४ निष्पाप बालकांचा बळी घेतला आहे. मात्र हा बिबट्या हाती लागत नसल्याने अखेर त्याला ठार करण्याची परवानगी वनविभागाकडून मागण्यात आली आहे.

या बिबट्याला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नाशिकच्या जंगलात आणि शेतांमध्ये गेल्या काही दिसांपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. गेल्या ८ दिवसांपासून वनविभाग आणि स्थानिक गावकरी मिळून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवरगाव, ब्राम्हणवाडे, पिंपळद गावांच्या परिसरात पाहारा देत आहेत. वनविभागाचे पथक याठिकाणी २४ तास पहारा देत आहे.

मागील ५ ते ६ महिन्यात या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या ६ घटना घडल्या. यामध्ये ४ निष्पाप बालकांचा बळी गेला होता. बळी गेलेल्या बालकांमध्ये ३ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

बिबट्याला जेरबंद करण्याच्या या मोहिमेसाठी वनविभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी १६ पिंजरे आणि २५ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र तरीही बिबट्या हाती लागत नसल्याने अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील बिबट्याचा शोध घेतला जात आहे. एवढे प्रयत्न करूनही या बिबट्याचा थांगपत्ता लागत नाहीये. अखेर या बिबट्याचा एन्काऊंटर करण्याची परवानगी वनविभागाने मागितली आहे. (Nashik News)

बिबट्या संरक्षित प्राणी असल्यानं बिबट्याची हत्या करत येत नाही. मात्र बिबट्या नरभक्षक झाल्यास अथवा अन्य अपवादात्मक परिस्थितीत बिबट्याला ठार मारण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी अटी शर्ती आणि कडक नियम आहेत. परवानगी मिळाल्यानंतर संबंधित बिबट्या हा नरभक्षक आहे, याची देखील शहानिशा करावी लागते. त्यामुळे या बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळते का आणि त्याचा एन्काऊंटर होणार का? हे पाहणं महत्वाचं आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Viral Video: प्रवाशांची हातापायी आता थांबणार, प्रवाशाने ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Election : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा भूकंप, ५२ पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, भाजपला जाहीर पाठिंबा!

SCROLL FOR NEXT