BJP-Congress Alliance : एकमेकांचे कट्टर विरोधक काँग्रेस-भाजप 'या' जिल्ह्यात एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चाच चर्चा

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात थेट काँग्रेस-भाजपची युती; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
BJP-Congress Alliance
BJP-Congress AllianceSaam Tv
Published On

अमर घटारे, अमरावती

Amravati News : येत्या 30 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. त्याआधीच अमरावतीत भाजप आणि काँग्रेस यांनी युती करून नवीन राजकीय समीकरण जन्माला घातलं आहे. या निवडणुकीसाठी भाजप खासदार अनिल बोंडे यांनी चक्क काँग्रेससोबत युती केल्याने खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

BJP-Congress Alliance
Pune Crime News: बिर्याणी न दिल्याचा राग; हॉटेल चालकाला बेदम मारहाण

राज्यात व देशात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या सोबत काँग्रेसने (Congress) सहकार क्षेत्रात युती केल्याने या अभद्र युतीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. वरुड बाजार समितीमध्ये पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. भाजपने (BJP) अमरावतीच्या वरुड बाजार समितीत आपल्या कट्टर विरोधक काँग्रेससोबत युती केली आहे. भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी काँग्रेस सोबत युती केलेली आहे.

BJP-Congress Alliance
Wardha Crime News : खुनाच्या गुन्ह्यात 4 वर्षांपासून फरार आरोपी अटकेत; पुलगाव पोलिसांची कारवाई

तर भाजप काँग्रेसच्या या युतीवर खासदार अनिल बोंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वरुडमध्ये राष्ट्रवादीने प्रगती होऊ दिली नाही त्यामुळे ती राष्ट्रवादीची सत्ता उलटून टाकण्यासाठी युती करण्यात आली आणि सहकार क्षेत्रात पक्ष नसतो गटा तटाच्या निवडणुका असतात अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली. (Latest Political News)

दरम्यान भाजपसोबत युती केल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. तर भाजपसोबत युती करत असताना काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले यांना विश्वासात घेतल नाही का, असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com