Pune Crime News: बिर्याणी न दिल्याचा राग; हॉटेल चालकाला बेदम मारहाण

बिर्याणी न दिल्याचा राग; हॉटेल चालकाला बेदम मारहाण
Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv

पुणे : रात्री उशिराने हॉटेलमध्‍ये येवून बिर्याणीची ऑर्डर दिली. परंतु, बिर्याणी संपली असल्‍याचे सांगितले. यावरून (Pune News) पुण्यातील वाघोलीमध्ये बिर्याणी न दिल्याच्या कारणावरून तिघांनी हॉटेल चालकाला बेदम मारहाण (Crime News) केल्याची घटना घडली. (Latest Marathi News)

Pune Crime News
Virar Accident News: ट्रकखाली ३ जण चिरडले; एकाचा जागीच मृत्यू, पती–पत्‍नी गंभीर जखमी

भावडी (ता. हवेली) येथील आदेश ओंकार कदम (वय २५) असे जखमी झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. त्यांनी लोणीकंद पोलिस (Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत सातव, अनिकेत सुरेश सातव यांच्यासह तिघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News
Sambhaji Nagar: बायकोशी भांडण झालं, पतीनं विमानतळ उडवून देण्याची धमकी दिल्यानं प्रशासन हादरलं

लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघे आरोपी बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी हॉटेल चालक ओंकार कदम यांच्याकडे बिर्याणी मागितली. परंतु बिर्याणी संपल्याचे त्यांनी सांगितले. या कारणावरून तिघांनी ओंकार यांना लाथाबुक्क्यांनी आणि विटांनी चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर मारहाण केली.अधिक तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com