Sambhaji Nagar: बायकोशी भांडण झालं, पतीनं विमानतळ उडवून देण्याची धमकी दिल्यानं प्रशासन हादरलं

बायकोशी भांडण, पतीचा एक फोन अन्‌ अख्‍खे प्रशासन हादरले
Sambhaji Nagar
Sambhaji NagarSaam tv

नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : घरात बायकोसोबत भांडण झाल्यामुळे पोलिसांना फोन करून चुकीची माहिती दिल्यास पोलीस (Police) अटक करतील. म्हणून एका रिक्षा चालकाने विमानतळावर बॉम्बस्फोट होणार असल्याची (Aurangabad) माहिती फोन करून पोलिसांना दिली. यामुळे मात्र पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. (Breaking Marathi News)

Sambhaji Nagar
Video: कृष्णाच्या पात्रात बैल आणि मगरीचा थरार; चार तासाच्या धडपडीनंतर मगरीच्या तावडीतून बैलाची सुटका

आतापर्यंत नवऱ्याचे बायकोसोबत भांडण झाल्यानंतर घर सोडण्यासारख्या घटना अनेकदा ऐकल्या असतील. परंतु छत्रपती संभाजीनगर शहरात एका पठ्ठ्याने बायकोसोबत भांडण झाल्यामुळे विमानतळावर बॉम्बस्फोट करणार असल्याचा फोन पोलिसांना केला. यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. कारभारी कडुबा रिठे असे खोटे माहिती देणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव आहे. मांगिरबाबाच्या जत्रेला जात असताना गाडीतील चार व्यक्ती उद्या व परवा विमानतळावर (Airport) बॉम्बस्फोट करणार असल्याची चर्चा करत होते; अशी माहिती देणारा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला या फोनमुळे सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली.

Sambhaji Nagar
Virar Accident News: ट्रकखाली तीन जण चिरडले; एकाच जागीच मृत्यू, पती– पत्‍नी गंभीर जखमी

पथक विमानतळावर पोहचले अन्‌

एमआयडीसी सिडको पोलिसांसह बीडीडीएसच्या पथकाने विमानतळावर धाव घेतली. त्याठिकाणी तपासणी केल्यानंतर काहीच नसल्याचे निष्पन्न झाले. फोन लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता, त्याने बायको सोबत भांडण झाल्यामुळे असा फोन केल्यास पोलीस अटक करतील. म्हणून चुकीची माहिती देणारा फोन केल्याचे सांगितले. या रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. एकंदरीतच विमानतळावर बॉम्बस्फोटाचा फोन आल्याने सर्व पोलीस यंत्रणा, एटीएस पथक, बीडीडीएस आदी सर्व पथके खडबडून जागी झाली असली तरी या फोनमुळे त्यांची चांगलीच धावपळ झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com