Nandurbar School Bus Plunges into Valley Saam
महाराष्ट्र

भीषण अपघात! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस थेट १५० फूट खोल दरीत कोसळली, एकाचा मृत्यू

Nandurbar School Bus Plunges into Valley: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगातील देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात घडला. स्कूल बसमध्ये २० ते ३० विद्यार्थी असल्याची माहिती. एकाचा मृत्यू.

Bhagyashree Kamble

  • नियंत्रण सुटलं अन् स्कूल बस थेट १५० फूट खोल दरीत कोसळली

  • २०-३० विद्यार्थी जखमी

  • एकाचा मृत्यू

नंदुरबारमधून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. सातपुडा पर्वतरांगातील देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात घडला. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, या स्कूल बसमधून साधारण २० ते ३० विद्यार्थी प्रवास करीत होते. अपघातामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, जखमी विद्यार्थ्यांना रूग्णालयात हलवण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगातील देवगोई घाट परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. मोलगी गावाहून अक्कलकुवाच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना आम्लीबारी घाटात हा अपघात घडला. नियंत्रण सुटल्यानं स्कूल बस खेट दरीत कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, स्कूल बसमध्ये साधारण २० ते ३० विद्यार्थी असल्याची माहिती आहे.

दीडशे फूट खोल दरीत स्कूल बस कोसळल्यानं गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दरम्यान, अपघात घडल्यानंतर अनेक विद्यार्थी स्कूल बसखाली दबले गेले. या दुर्देवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, अनेक विद्यार्थी जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना तसेच बचाव पथकाला या अपघाताबाबत माहिती दिली. बचाव पथकांनी स्थानिकांची मदत घेऊन विद्यार्थ्यांना स्कूल बसमधून बाहेर काढलं. तसेच जवळच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेलं. सध्या जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कसा घडला? याबाबत चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT