

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील चुराह मतदारसंघातील भाजप आमदारावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी भाजप आमदार हंस राज यांच्याविरूद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये आमदाराने एका अल्पवयीन पीडितेचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहितीनुसार, पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून, तिची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
डीएसपी हितेश लखनपाल यांच्या मते, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहे. पीडितेच्या वडिलांनी आमदार हंस राज, लेख राज आणि मुनियान खान यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
तक्रारीत वडिलांनी सांगितलं की, पीडितेला अपहरण करून शिमलामध्ये नेलं, तसेच तिच्या जबाबात बदल करण्यास सांगितले. आमदाराविरोधात पहिला एफआयआर १६ ऑगस्ट २०२४ रोजी चंबा येथील महिला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये त्यांच्यावर अश्लील संदेश पाठवणे, नग्न छायाचित्र मागणे, धमकी देणे असा आरोप करण्यात आला होता. नंतर महिलेनं आरोप मागे घेतले.
सहा दिवसांपूर्वी पीडितेनं सात मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यात तिनं दावा केला होता की, आमदारानं कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. आमदाराने पीडितेने केलेले सर्व फेटाळून लावले आहेत. तसेच मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं. पीडितेच्या कुटुंबियांनी नंतर काँग्रेस नेते यशवंत खन्ना यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. तसेच आमदारावर गंभीर आरोप केले.
दरम्यान, हिमाचल प्रदेश महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.