Acccident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, ५० प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस दरीत कोसळली

Ratnagiri Kolhapur Highway Road Aamba Ghat Accident : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात खासगी ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस ७० फूट दरीत कोसळून ७ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत. साखरपा पोलीस घटनास्थळी उपस्थित राहून तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • आंबा घाटात खासगी बस दरीत कोसळली

  • सर्व ५० प्रवासी जखमी, जीवितहानी नाही

  • दुर्घटनेत बसचा चक्काचूर

  • साखरपा पोलीस पुढील तपास करत आहेत

रत्नागिरीतून मोठी बातमी समोर आली आहे. ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस आंबा घाटात ७० फूट खाली कोसळली असून ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला आहे. या घटनेचा सविस्तर तपास साखरपा पोलीस करत असून गाडीचा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. आंबा घाट चक्री वळणावर ही घटना घडली असून बस ७० फुट खोल दरीत कोसळली आहे. या बसमध्ये ५० प्रवासी असल्याचं म्हटलं जात आहे. अपघात झालेल्या बसला दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न अद्याप सुरु आहेत.

सुदैवाने बस ७० फूट दरीत कोसळली असली तरी कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र बसमधील ७ ते ८ प्रवाशी किरकोळ जखमी असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच बस दरीत कोसळल्याने तिचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती साखरपा पोलिसांना देण्यात आली. मिळालेल्या माहितीनंतर साखरपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hysterectomy effects: महिलांच्या शरीरातून गर्भाशय काढल्यानंतर कोणते बदल होतात? यामागे कोणती कारणं असतात?

Maharashtra Live News Update: नाशिक -पुणे महामार्गावर गेल्या एक तासापासून प्रचंड वाहतूक कोंडी

Shocking : Pune: २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, आईच्या प्रियकराचं भयंकर कृत्य; मालिश करायला सांगायचा अन्...

Indigo Airlines: २४ तासांत ५५० हून अधिक उड्डाणे रद्द, इंडिगोच्या प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

Mumbai Pune Highway : मुंबई- पुणे महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ; क्षमतेपेक्षा चारपट प्रवासी एकाच रिक्षात कोंबले; थरारक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT