Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident : अयोध्येला जाताना भीषण अपघात! भाविकांच्या बसला ट्रेलरची धडक, एकाचा मृत्यू तर ३० जखमी

Ayodhya Devotees Accident News : अयोध्याहून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला सुलतानपूरमध्ये भीषण अपघात झाला. एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू असून पोलिस तपास करीत आहेत.

Alisha Khedekar

  • अयोध्या दर्शनावरून परतणाऱ्या जळगावच्या भाविकांचा भीषण अपघात

  • एक महिला भाविक ठार, अनेक जण गंभीर जखमी

  • स्थानिक नागरिकांनी बचावकार्य करून रुग्णालयात दाखल केले

  • पोलिस तपास सुरू

जळगाव मधून मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्याहून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा भीषण अपघात झाला. हा अपघात धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ गावातील भाविकांच्या बसला उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील अयोध्या-प्रयागराज महामार्गावर झाला. या दुर्घटनेत एका महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून २५ ते ३० जण जखमी झाल्याची झाले. आज शनिवारी पहाटे ४ वाजता हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथील भाविक अयोध्यातील भगवान राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर बसने प्रयागराजला जात होते. या बसमध्ये अंदाजे ४० भाविक होते. भाविकांनी भरलेली बस सुलतानपूर येथील कुरेभर चौकात पोहोचताच, समोरून एका अनियंत्रित ट्रेलरने बसला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बस आणि ट्रेलर दोन्ही उलटले.

उलटलेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक आणि रस्त्यावरून जाणारे लोक मदतीसाठी धावले. सुमारे १५ ते २० भाविकांना दुखापत झाली. तर एका महिला भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेद्वारे कुरेभर सामुदायिक आरोग्य केंद्रात तातडीने नेण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हा अपघात नेमका कसा झाला? अपघातात नेमकी चूक कोणाची याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. शिवाय फिरायला गेलेल्या सर्व नागरिकांशी स्थानिक प्रशासनासोबत संवाद सुरू आहे. जखमींना रेल्वेने जळगावत आणण्याचा देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी बोलताना दिली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर 'एलसीबी'चा छापा

पत्नीचा मोबाईल रिचार्ज केला, पण सेवा ठप्पच राहिली; तरुणाचा पारा चढला अन् दुकानदारासोबत नको ते घडलं|VIDEO

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांत शाब्दिक बाचाबाची|VIDEO

Devendra Fadnavis : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन

Prajakta Gaikwad New Video: लग्नानंतर प्राजक्ताचा पारंपारिक पद्धतीने चुडा उतरवण्याचा कार्यक्रम; व्हिडीओ पाहून होतय सौंदर्याचं कौतुक

SCROLL FOR NEXT