Vaijapur Drowning Case Saam Tv News
महाराष्ट्र

मित्रांसोबत नदीवर पोहायला गेला, उपसरपंचाचा मुलगा पाण्यात वाहून गेला, २३ वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू

Vaijapur Drowning Case: वैजापूरच्या राहेगावातील ढेकू नदीत तिघे तरुण पोहण्यासाठी उतरले. तिघेही वाहून गेले. दोघांना वाचवण्यात यश. उपसरपंचाच्या मुलाचा बुडून मृत्यू.

Bhagyashree Kamble

  • ढेकू नदीत तीन तरूण पोहण्यासाठी गेले.

  • पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

  • उपसरपंचाच्या मुलाचा बुडून मृत्यू.

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील राहेगावातून दुर्देवी घटना समोर येत आहे. ढेकू नदीच्या पाण्यात बुडून माजी उपसरपंचाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ढेकू नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर काही तरूण पोहायला गेले होते. यात तीन तरूण पोहताना पाण्यात वाहून गेले. यातील दोघांना नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचवलं. मात्र, माजी उपसरपंचाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

अजय पांडुरंग (वय वर्ष २३) असे माजी उपसरपंचाच्या मुलाचे नाव आहे. ओम सतीश बोरकर, अक्षय बाळू शेलार असे २ बचावलेल्या तरूणांचे नाव आहे. वैजापूरच्या राहेगाव येथील ३ मित्र पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिघेही तरूण वाहून जात होते. स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी दोघांना वाचवण्यात आले. मात्र, उपसरपंचाचा मुलगा पाण्यात वाहून गेला. शोधकार्य सुरू असताना बराच वेळ होऊन तो सापडला नाही. अजय सापडला नसल्यामुळे स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशामक विभागाला दिली.

अग्निशामक विभागाच्या पथकाने तातडीने शोधकार्याला सुरूवात केली. १ किलोमीटर अंतरावर अजयचा मृतदेह सापडला. मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. अजय याच्या पश्चात आई- वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. या घटनेनंतर गावातून शोक व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोक्यावर रॉडने वार, गळाही चिरला, भींतीवर रक्ताचे थारोळे; मदरशातील शिक्षकाला बायकोनेच संपवलं

Seeds: 'या' बियामध्ये आहे नॉनव्हेजपेक्षाही भरभरुन प्रोटीन, शरीरासाठी ठरेल सूपरफूड

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; आता पैसे हवे असतील तर...; सरकारचा नवा नियम काय?

Maharashtra Live News Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

Ramdas Kadam Vs Anil Parab: हा भा#$@...; रामदास कदमांची अनिल परब यांच्यावर आगपाखड|VIDEO

SCROLL FOR NEXT