Ratnagiri- Kolhapur Highway Traffic Update, Ratnagiri News  saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri- Kolhapur Highway Traffic Update : रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील रस्ता खचला, वाहतूक धिम्या गतीने सुरु

या महामार्गावर बहुतांश ठिकाणी छाेटे माेठे खड्डे पडले आहेत.

अमोल कलये

Ratnagiri News : रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील (Ratnagiri- Kolhapur Highway) रस्ता खचल्याने या महामार्गावरील वाहतुकीवर गुरुवार रात्रीपासून माेठा परिणाम झाला आहे. आज (शुक्रवार) सकाळपासून या महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. (Maharashtra News)

रत्नागिरी आणि काेल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसामुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. पहिल्याच पावसाचा फटका रत्नागिरी काेल्हापूर महामार्गावरील रस्त्याला (road) देखील बसला आहे. या महामार्गावर बहुतांश ठिकाणी छाेटे माेठे खड्डे पडले आहेत. यामुळे महामार्गावरुन प्रवास करणा-यांचे हाल हाेताहेत.

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील नाणीज जवळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास रस्ता खचला. सध्या मिऱ्या ते नागपूर जाणाऱ्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आहे सुरु. रात्री साडेबारा वाजल्यापासून कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतुक ठप्प झाली होती. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली. दरम्यान यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

पर्यायी मार्ग

पावसामुळे राज्य महामार्ग क्रमांक 166 पाली ते साखरपा गाव दरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचल्याने राज्य महामार्ग रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत वाहतुक बंद करण्यात आली आहे.

मुंबई व रत्नागिरीकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पाली पासून लांजा - दाभोळ मार्गे कोल्हापूर दिशेने वळविण्यात आलेली आहे

कोल्हापूरकडून येणारी वाहतूक दाभोळ फाटा - लांजा - मार्गाने वळविण्यात आलेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT