nagpur, crime news, crime branch saam tv
महाराष्ट्र

Crime News : व्यापा-याच्या मुलाने स्वत:च्या घरातून चाेरले 73 लाख; दाेघे अटकेत

या गुन्ह्याची उकल पाेलिसांनी अवघ्या काही तासांत केली.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : नागपूरात मुलानेच स्वतःच्या घरात तब्बल 73 लाखाची चोरी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नागपूरातील (nagpur) शांतीनगर भागात इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक जावेद थारा (Javed Thara) यांच्या घरात हा प्रकार घडला आहे. (Nagpur Latest Marathi News)

जावेद थारा हे रविवारी रात्री लग्न समारंभावरून घरी परतले. त्यावेळी त्यांनी घरात चोरी झाल्याचं निदर्शनास आले. चाेरट्यांनी इलेक्ट्रॉनिक लॉकर तोडून तब्बल साठ लाख रुपयांचे सोने आणि तेरा लाख रुपये चोरुन नेले हाेते. (Maharashtra News)

या घटनेच्या तपासात क्राईमब्रांचच्या युनिटने दुकानातील कर्मचाऱ्यांला पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा मुलगा जाफरने घरात पैसे चोरुन दुबईला जाण्याची याेजना आखल्याची माहिती समाेर आली.

त्यानंतर पाेलिसांनी जावेद यांचे मुलगा जाफर आणि वाजीद वल्द गफ्फुर अली या दाेघांना अटक (arrest) केली. पोलिसांनी त्याच्यांकडून (73 लाखाचा) मुद्देमला जप्त केला आहे. या प्रकरणाचा सखाेल तपास सुरु असल्याची माहिती चिन्मय पंडित (पोलीस उपआयुक्त, क्राईम ब्रांच) यांनी दिली. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

SCROLL FOR NEXT