सातारा : तुम्ही महाबळेश्वरला येणार असाल तर थोडं थांबा ही बातमी बघा आणि नंतर ठरवा. राज्य शासनाने जारी केलेल्या नवीन आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर देखील पर्यटना साठी बंद करण्यात आले आहे. महाबळेश्वर मधील सर्व पर्यटनस्थळे बंदच राहणार असून फक्त हॉटेल सुरू राहणार आहेत. मात्र पाचगणी महाबळेश्वर (Pachgani Mahabaleshwar) मधील हॉटेलमध्ये राहण्यासाठी सुद्धा तुम्ही लसीचे दोन्ही डोस (Vaccination) घेतलेले पाहिजे तरच तुम्हाला हॉटेल मध्ये प्रवेश मिळणार आहे.
या आदेशा विरोधात हॉटेल व्यावसायिकांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली महाबळेश्वरची (Mahabaleshwar) पर्यटन स्थळे खुली करा; अशी मागणी तेथील व्यापाऱ्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती.
हे देखील पहा -
परंतु जिल्ह्यातील सध्याची कोरोनाबाधित रुग्णांची होणारी वाढ पाहता या निर्णयाबाबत कोणतीही शिथिलता न देता राज्याला जे आदेश आहेत तेच आदेश महाबळेश्वरला सुद्धा असतील अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Guardian Minister Balasaheb Patil) यांनी मांडली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या बरोबर झालेल्या बैठकी नंतर सुद्धा आता महाबळेश्वर च्या पर्यटनाला दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता जर महाबळेश्वर ला यायचे असेल तर फक्त हॉटेल मध्येच राहावे लागणार आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.