बुकिंग नाही तर दर्शन नाही! कोरोनाच्या नव्या निर्बंधांचा देवदर्शनाला मोठा फटका

राज्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या परत एकदा वेगाने वाढत आहे.
Corona Restrictions
Corona RestrictionsSaam Tv
Published On

मुंबई: राज्यामध्ये कोरोनाची (Corona) रुग्णसंख्या परत एकदा वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परत एकदा कठोर निर्बंध (Restrictions) लावण्यात आले आहेत. अर्थातच अजून पूर्ण लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला नसला तरी निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. अनेक मंदिरांमध्ये (temples) दर्शनावर निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या नव्या निर्बंधांचा कोल्हापूरच्या (Kolhapur) अंबाबाई आणि ज्योतिबा देवाच्या भक्तांना (devotees) मोठा फटका बसला आहे.

हे देखील पहा-

तुम्ही जर अंबाबाई किंवा ज्योतिबाच्या दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची असणार आहे. कोरोनामुळे आता बऱ्याच मंदिरांमध्ये दर्शनाकरिता ऑनलाइन (Online) स्लॉट बुकिंग करून दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि ज्योतिबा ऑनलाइन दर्शनाचे वाढत्या कोरोनामुळे कमी करण्यात आले आहेत. तासाला फक्त ४०० भाविकांनाच दर्शन मिळणार आहे. देवस्थानचे सचिव यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

Corona Restrictions
गोव्यात भाजपला मोठा धक्का; मायकल लोबोंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

वाढत्या कोरोनामुळे तासाला केवळ ४०० भाविकांना दर्शन घेता येणार आहे. कोव्हिडचा संसर्ग टाळण्याकरिता मास्क (Mask), सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा (sanitizer) वापर या सर्व गोष्टींचे भाविकांना पालन करणे बंधनकारक असणार आहे. नव्या स्लॉट पद्धतीची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी गर्दी न करण्याचे देवस्थान समितीकडून भाविकांना आवाहन करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com