वृत्तसंस्था: गोव्याबरोबरच ५ राज्यांच्या निवडणुका (Elections) जाहीर करण्यात आले आहेत. अशात आता गोव्यातील (Goa) भाजपचे कळंगुटमधील आमदार (MLA) आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी राजीनामा (Resigned) दिला आहे. लोबो यांनी आमदार आणि मंत्रीपदाचा (Ministerial) देखील राजीनामा दिला आहे. सोमवारी सकाळी आपला मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) सादर केला आहे. तर यावर त्यांनी विधानसभा (Assembly) अध्यक्षांना आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. (Goa Michael Lobo resigns latest news)
हे देखील पहा-
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार लोबो म्हणाले की, 'मी गोवा मंत्रिमंडळ आणि आमदार या दोन्ही पदांचा राजीनामा देत आहे. गोवा भाजप मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे घेऊन जाताना त्यांना दिसत नाही. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांना भाजपने (BJP) बाजूला केले आहे. मायकल लोबो आता काँग्रेस (Congress) पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मागील वर्षभरापासून लोबो यांनी सरकारवर नाराजी दाखवत आरोप करण्यास सुरुवात केली होती. यामुळे ते खूपच चर्चेमध्ये होते .
मायकल लोबो हे २००५ साली भाजपमध्ये प्रवेश केले होते. त्यांनी २०१२ साली भाजपकडून निवडणूक लढवली होती. ते सलग २ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागीलवर्षी त्यांना ग्रामीण विकास आणि घनकचरा व्यवस्थापन मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आली होती. मात्र, आता त्यांनी मंत्रीपदासह आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मी गोव्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कळंगुट मतदार संघातील लोक माझ्या निर्णयाचा आदर करतात, अशी आशा आहे. पुढे काय पाऊल टाकायचे ते बघू. इतर पक्षांशी चर्चा सुरु आहे, असे मायकल लोबो यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.