समुद्र पर्यटनासह गड-किल्यावर पर्यटन बहरणार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

समुद्र पर्यटनासह गड-किल्यावर पर्यटन बहरणार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

रायगड जिल्ह्यातील समुद्र पर्यटनासह, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे, स्मारकं पर्यटकांसाठी खुली करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने हळूहळू व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली. समुद्र पर्यटनास आधीच परवानगी दिली असली तरी ऐतिहासिक गड, किल्ले, स्मारकं या प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांना बंदी होती. मात्र आता ही बंदी उठविण्यात आली असून कोरोनाच्या नियमांचे पालन करून पर्यटकांना गड, किल्ले, स्मारकं या प्रेक्षणीय स्थळावर पर्यटनास रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी परवानगी दिली आहे. (Tourism will flourish on the fort along with sea tourism; Order issued by Raigad District Collector)

हे देखील पहा -

याबाबतचे आदेश नुकतेच रायगड जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. त्यामुळे पुन्हा रायगडातील ऐतिहासिक रायगड, जंजिरा, कुलाबा, आगरकोट आणि इतर किल्ल्यांसह लेणी, स्मारकं या प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची पावले वळणार आहेत. गड, किल्यावर पर्यटनास परवानगी दिल्याने स्थानिक व्यवसायिकही आनंदित झाले आहेत.

एप्रिल २०२० पासून राज्यात कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने पुन्हा संचारबंदी लागू झाली.  रायगडातही कोरोना वाढल्याने पर्यटनाला खीळ बसली. ऑगस्ट महिन्यापासून कोरोना हा आटोक्यात येऊ लागला आणि हळूहळू व्यवहार सुरू झाले. समुद्र पर्यटनाला शासनाने परवानगी दिली. त्यामुळे रायगडात पुन्हा पर्यटन बहरले. मात्र गड, किल्ले, स्मारक यांना पर्यटकांना जाण्यास परवानगी मिळालेली नव्हती. त्यामुळे याठिकाणचे व्यवसायिक हे अडचणीत आले होते.

रायगड जिल्हाधिकारी यांनी ऐतिहासिक स्थळे, स्मारक खुली करण्याबाबत केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे परवानगी मागितली होती. केंद्रीय विभागाने कोरोना नियमांचे पालन करून ऐतिहासिक स्थळे, स्मारक खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे, स्मारक ही पर्यटकांसाठी पर्यटन करण्यास खुली केली आहेत. त्यामुळे गड, किल्ले, स्मारकं पर्यटनास खुली झाली असल्याने पर्यटकही आता रायगडच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यास आतुर झाले आहेत. गड, किल्ले, स्मारक याठिकाणी पर्यटन सुरू झाल्याने स्थानिक व्यवसायिक हे सुद्धा आनंदित झाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT