Wednesday Horoscope: या राशींना मेहनतीशिवाय पर्याय नाही, काहींना गंभीर आजारांना जावं लागेल सामोरं, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

कोणत्याही गोष्टीची चाल चाल ढकल आज परवडणारी नाही. जीव ओतून काम करावे लागेल. कामाच्या निमित्ताने प्रवास होतील.

मेष राशी | saam

वृषभ

आजपर्यंत केलेल्या कामाचे चीज होण्याचा आजचा दिवस आहे. मनी - धनी नसताना काही चांगल्या बातम्या कानावर येतील.

वृषभ | Saam Tv

मिथुन

कागदपत्रांशी निगडित व्यवहार आज जपून करावे लागतील. कुठेही साक्षीदार राहू नका. आपल्या व्यक्तींसमोर मन मोकळे करायला हरकत नाही.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

कोणासाठी कितीही केले तरी सुद्धा काही गोष्टींचा गाडा आपल्यालाच ओढावा लागतो. संसारिक जबाबदाऱ्या पार पाडताना आज दमछाक होईल.

कर्क राशी | saam

सिंह

पाठीच्या मणक्याचे आजार, हृदयाचे आजार ज्यांना आहे त्यांच्यासाठी आज विशेष अलर्टचा दिवस आहे.

सिंह राशी | saam

कन्या

विष्णू उपासनेने मनोरथ पूर्ण होतील. ठरवाल तशा गोष्टी होतील. प्रेमवीरांना आजचा दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे. धनयोग सुद्धा चांगले आहेत.

कन्या | Saam Tv

तूळ

व्यवसायामध्ये वृद्धीचा दिवस आहे. नवनवीन संकल्पनांनी भरलेल्या गोष्टी आज अमलात आणाल. जमिनीशी निगडित व्यवहारी होतील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

जपलेल्या गोष्टी वेळेला कामाला येतात मग ते नातेवाईक असो शेजारी असो मित्र-मैत्रिणी असो.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

धनयोग चांगले आहेत. पैशाची साठवण करण्यापेक्षा तो खेळता पैसा अधिक चांगला राहतो हे आपल्याला जाणवेल. कुठेतरी मोठ्या व्यक्तीच्या सल्ल्याने पुढे जाल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

शक्यतो आपल्याच धुंदीमध्ये असणारी आपली रास आहे. आज अधिक स्वमग्न होईल. याच गोष्टी तुम्हाला आवडतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

संकटातून मार्ग आज काढावा लागेल. कारण नसताना पुढे कटकटी उभ्या राहतील. खर्चालाही धरबंद राहणार नाही.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

जवळच्या लोकांबरोबर स्नेहबंध दृढ होतील. प्रेमामध्ये यश मिळण्याचा आजचा दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: भुवया आणि पापण्यांचे केस खूपच पातळ दिसतायेत? बनवा हे सोपे घरगुती सीरम, ७ दिवसांत जाणवेल फरक

eyebrow growth serum | google
येथे क्लिक करा