Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर कडकडीत बंद

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, फलटणमध्ये बीडच्या महिला डॉक्टराची आत्महत्या, मोंथा चक्रीवादळाचे संकट, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Bacchu kadu: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा

बच्चू कडू यांच्या दुसरा दिवसाच्या ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात.....

राज्यभरातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते नागपूरकडे निघाले

वर्धा जिल्ह्यातील सुकळी गावातून ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात

बच्चू कडू दुसऱ्या दिवशीही स्वतः ट्रॅक्टर चालवत आहे

मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर,कॉम्रेड अजित नवले देखील ट्रॅक्टर मोर्चा सहभागी

बच्चू कडू यांच्या महा एल्गार मोर्चामध्ये धनगर बांधव आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन धनगरी वेशात सहभागी

आणखी 52 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ट्रॅक्टर मोर्चा नागपूरला धडकणार

दुपारी बच्चू कडू यांची नागपूरच्या कापूस संशोधन केंद्राच्या मैदानावर महा एल्गार सभा

Beed: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर कडकडीत बंद

सकाळपासून दुकाने व बाजारपेठा ठेवण्यात आल्या बंद

शहरवासीय व सर्वपक्षीयांच्या वतीने थोड्याच वेळात काढण्यात येणार मोर्चा

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातीला आरोपींना फाशी द्यावी,कडक कारवाई करावी अशी नागरीकांची मागणी

Nanded: नांदेडमध्ये छट पूजा सण उत्साहात साजरा

नांदेडमध्ये छट पूजा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड शहरातील आसना नदीच्या काठावर हा सण साजरा करण्यात आला. उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात केला जातो.आता महाराष्ट्रातील अनेक भागात देखील छटपूजा हा सण साजरा करण्यात येत आहे.चार दिवस देवीची आराधना करून हा सण साजरा केला जातो.

Ratnagiri: मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट

अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा

अरबी समुद्र देखील असणार खवळलेला, जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाची बरसात

मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता

किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची देखील शक्यता

ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहणार

आज देखील मच्छीमारांना खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असं आवाहन

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन

किनारपट्टी भागात सकाळपासून ढगाळ हवामान

काल रात्री देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

आणखीन दोन दिवस कोकण किनारपट्टी वरती पावसाची शक्यता

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

धंगेकर आज मुंबईला येणार आणि एकनाथ शिंदे यांची भेट

जैन बोर्डिंग च्या विषयाबाबत रवींद्र धंगेकर करणार एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा

दोन दिवस केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर काही बोलू नका योग्य तोडगा निघेल असा आश्वासन एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना दिलं होतं

दोन दिवसानंतर स्वतः रवींद्र धंगेकर आज मुंबईत याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी करणार चर्चा

Eknath Khadse: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील निवासस्थानी चोरी

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील निवासस्थानी चोरी झाले आहे..

एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडत तर मजला तसेच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे.

नेमकं चोरट्यांनी किती मुद्देमाल ते चोरून नेला ही माहिती अध्याप समोर आलेली नाही.

घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे.

सायबर क्राईम करून पैशांची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक,दोन आरोपी परराज्यातील

हिंगोलीत सायबर पोलिसांनी मोठी कार्यवाही केली आहे, बाहेर राज्यातून लॅपटॉप सह इतर साहित्य सोबत घेऊन येत नागरिकांना जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या परराज्यातील दोघांना हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतले तर यामध्ये हिंगोली मधील एका आरोपीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, प्रल्हाद शंभुलाल स्वालका, मनोज ओमप्रकाश शर्मा अशी बाहेर राज्यातील आरोपींची नावे आहेत तर हिंगोलीच्या शिरडशहापूर मधील मनोज शिवहार स्वामी असे हिंगोलीतील एका आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक चार चाकी वाहन, दोन लॅपटॉप सह आयपॅड असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची स्वप्नं चिरडली

भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी आकाश अचानक काळवंडलं,आणि क्षणातच अस्मानी संकट कोसळलं.साकोली, लाखनी, पवनी या तालुक्यांत सलग तीन ते चार तास मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला.पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत क्षणात वाहून गेली!कापणी करून शेतात ठेवलेलं धान पाण्यात बुडालं,तर बांध्यात उभं असलेलं पीक चक्क जमीनदोस्त झालं...पाण्याखाली गेलेल्या शेतांकडे पाहत शेतकऱ्यांचे डोळे पाणावले.....ज्यांच्या हातात आज धानाच्या गंजी असायला हव्या होत्या,त्या हातात आता फक्त चिखल आणि अश्रू उरले आहेत...! “संपूर्ण वर्षभर आम्ही उन्हातान्हात कष्ट करून पिक उभं केलं,पण आता ते पाण्यात गेलं… आम्ही काय करायचं?”अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार हिरावून घेतला आहे.धानाचं सोने आता मातीमोल झालं…आणि भंडाऱ्याच्या शेतकऱ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न —"देवा, आमचं काय चुकलं?…अशी भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीची ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत

जळगाव दोन वर्षांपासून रखडलेली जळगाव महापालिकेची निवडणूक प्रक्रिया अखेर गती घेत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ११ नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण सोडत होणार आहे.काही महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांचे लक्ष या सोडतीकडे लागून होते. आयोगाने २७ ऑक्टोबरला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे. या आरक्षण सोडत प्रक्रियेबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी महापालिका आयुक्तांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

प्रशांत बनकर ची पोलिस कोठडी आज संपणार...

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकर यांची पोलिस कोठडी आज संपते आहे.फलटण न्यायालयाने 28 ऑक्टोबर पर्यंत बनकर ला पोलिस कोठडी सुनावली होती.आज फलटण पोलिस प्रशांत बनकर ला पुन्हा न्यायालयात हजर करतील. मात्र फलटण पोलिस पुन्हा प्रशांत बनकर ची वाढवून पोलिस कोठडी ची मागणी करणार का हे पहावे लागणार आहे.

नागपूरसाहित विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचे संकट

- पुढील 3 दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता..

- बंगालच्या उपसागरात मोंथा चक्री वादळाचा विदर्भाला बसणार फटका

- अवकाळी पावसामुळे शेतकरी सापडणार अडचणीत.

- शेतात उभं असलेलं पीक पावसामुळे झोडपल जाणार

- कापूस, तूर, संत्रा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा बसणार मोठा फटका

- शेतकऱ्यांसह नागरिकांना सावधानतेचा हवामान विभागाचा इशारा.

पाथर्डी पोलीस ठाण्यात महिलांचा गोंधळ; चार महिलांमध्ये लाथाबुक्क्यांची मारामारी, चारही महिला अटक

पाथर्डी पोलीस स्टेशनमध्येच चार महिलांमध्ये लाथाबुक्क्यांची मारामारी होऊन वातावरण तंग झाले. उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून भांडण सोडविले. मात्र एकमेकींना धमक्या देत पुन्हा संघर्ष सुरू झाल्याने पोलिसांनी अखेर चौघींना अटक केली आहे.

एसटी बस मध्ये प्रवास करताना झालेल्या किरकोळ वादातून थेट पोलिस ठाण्यात आलेला वाद मारामारी पर्यंत गेला होता अखेर पोलिसांनी त्या महिलांविरोधात

बी.एन.एस कलम १७० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही महिलांना अटक केली आहे.या घटनेमुळे काही वेळ पोलीस ठाण्यात चांगलाच गोंधळ उडाला होता.

Maharashtra Live News Update: वसुधाताई पुंडलिकराव देशमुख यांचं निधन

अमरावती जिल्ह्याच्या जेष्ठ नेत्या माजी मंत्री वसुधाताई पुंडलिकराव देशमुख यांचं निधन

वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने वसुधाताई देशमुख यांच निधन...

गेल्या काही दिवसापासून अमरावती मध्ये एका खाजगी रुग्णालयात वसुधाताई देशमुख घेत होत्या उपचार

1999 ते 2004 मध्ये वसुधाताई देशमुख जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होत्या

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नेत्या होत्या

2004 च्या विधानसभा निवडणूक मध्ये अचलपूर मतदार संघातुन त्यांचा पराभव झाला होता

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वसुधाताई देशमुख मंत्रिमंडळात होत्या

अमरावती आणि विदर्भाच्या वसुधाताई देशमुख ह्या मोठ्या राजकारणी होत्या..

आज दुपारी अमरावती मध्ये होणार अंत्यसंस्कार..

nagpur | बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा आज नागपूरला

बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा आज दुपारी नागपूर शहरात धडकणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होणार असल्यामुळे नागपूर-वर्धा रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली असून, वाहतूक मार्गात बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे. वर्ध्याकडून नागपूरकडे येणारी वाहने जामठा चौक, एनसीआय, मेट्रो रेल्वे यार्ड, सिमेंट फॅक्टरी मार्गे वळवण्यात आली आहेत. कालच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी सुरक्षेचा आढावा घेतला.

YAVATMAL; यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 16 लाख मतदार

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील 16 लाख 61 हजार 537 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून प्रशासकीय तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान प्रशासन स्तरावर निवडणुकीची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.तसेच राजकीय पक्षही कामाला लागले आहे.सभांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना चार्ज केले जात आहेत तर दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत.

Pune | पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत आता ११ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील तारखा जाहीर केल्या आहेत. या सोडतीकडे राजकीय कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.११ नोव्हेंबरला प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होईल, ज्यावर २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती घेता येतील. त्यानंतर २ डिसेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवकांची निवड केली जाईल, ज्यात ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. आरक्षण जाहीर झाल्यावर कोणाचा पत्ता कट होणार, हे स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com