कृषी उत्पन्न बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक सुरू; यंदा चांगले दर मिळण्याची अपेक्षा

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक बाजारपेठ व व्यापाऱ्यांसाठी चिली पार्क यासाठी उदासीनता कायम आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक सुरू; यंदा चांगले दर मिळण्याची अपेक्षा
कृषी उत्पन्न बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक सुरू; यंदा चांगले दर मिळण्याची अपेक्षादिनू गावित
Published On

नंदुरबार: नंदुरबार मिरचीचे आगार (Chili depot) असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Market) लाल मिरचीची (Wet red chilli) आवक सुरू झाली असून सुरुवातीला दरामध्ये घसरण दिसून येत आहे. दिवाळीनंतर (Diwali) ओल्या लाल मिरचीचे दर स्थिर होत यंदा चांगले दर मिळण्याची अपेक्षा शेतकरी (Farmers) करत आहे. सध्या ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. हिरव्या मिरचीला यंदा अत्यंत कमी दोन ते तीन रुपये दर (Rate) मिळाला होता. चांगले दर मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी मिरची पिकवून बाजारात विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. (Wet red chilli arrives at Agricultural Produce Market Committee; Expect good rates this year)

हे देखील पहा -

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात यंदा ३ हजार ५२३ हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली होती. यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) जवळपास दोनशे हेक्टर वरील मिरची पिकाचे नुकसान झाले असून याबाबत कृषी विभागाद्वारे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्याला मदत देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यंदा जिल्ह्यात कमी पर्जन्यमान असले तरी मिरची पिकासाठी पोषक वातावरण असल्यामुळे विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हिरव्या मिरचीला दोन ते तीन रुपये दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत होते. चांगले दर मिळावे यासाठी शेतकऱ्यांकडून मिरची लाल झाल्यावर विक्रीला आणण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मिरचीवर आलेल्या व्हायरसमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्यावर्षी ओल्या लाल मिरचीला पंधराशे ते तीन हजार प्रति क्विंटल दर होता, तर सुक्या लाल मिरचीला पाच हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर होता. यंदा कृषी उत्पन्न बाजारात सुरुवातीच्या हंगामात पावसामुळे खराब झालेल्या ओल्या मिरचीची आवक जवळपास हजार ते पंधराशे क्विंटलपर्यंत झालेली असून दरांमध्ये ही घसरण आहे. येत्या काही दिवसात मिरचीची आवक आणि दर देखील चांगले मिळण्याची शक्यता बाजार समितीकडून व्यक्त केली जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक सुरू; यंदा चांगले दर मिळण्याची अपेक्षा
NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या कथित हेरगिरी प्रकरणी दोन कॉन्स्टेबल्सवर संशय...

मिरचीचे आगार असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत गुजरात (Gujrat), मध्यप्रदेश (Madhya Pradesh) व महाराष्ट्रातून (Maharashtra) मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून मिरची विक्रीसाठी आणली जात असुन बाजार समितीद्वारे लिलाव करून व्यापाऱ्यांद्वारे खरेदी करून शहराच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत पथारींवर मिरची सुकवण्यासाठी सुरुवात झाली आहे. मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक बाजारपेठ (Sophisticated market) व व्यापाऱ्यांसाठी जाहीर केलेलं चिली पार्कचे (chilli Park) स्वप्न यंदाही अपुरेच राहणार असल्याचे चित्र आहे. शासन व लोकप्रतिनिधींकडून अद्यापही यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे अवकाळी पावसामुळे पथारीवरील मिरची भिजुन शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान सुरुच आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com