राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला आता फक्त निसर्गाचे वरदान लाभले नाही, तर स्थानिक आदिवासी बांधवांसाठी रोजगाराचे नवे दालनही उघडले आहे. जिल्हा प्रशासनाच्या एका अभिनव उपक्रमाने तोरणमाळात 'होम स्टे' प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे, ज्यामुळे या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला नवसंजीवनी मिळणार आहे.
सातपुड्याच्या कुशीत वसलेले तोरणमाळ हे आपल्या मनमोहक नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. घनदाट जंगल, हिरवीगार वनराई, नागमोडी रस्ते आणि आल्हाददायक हवामान यामुळे तोरणमाळ पर्यटकांना नेहमीच खुणावत आले आहे. मात्र, आतापर्यंत येथे निवासाची मर्यादित सोय असल्याने अनेक पर्यटकांना नाइलाजाने परतावे लागत होते. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने तोरणमाळ होम स्टे उपक्रम सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत स्थानिक आदिवासी बांधवांना त्यांच्या घरातच पर्यटकांसाठी राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
हा 'होम स्टे' प्रकल्प केवळ पर्यटनाला चालना देणार नाही, तर तोरणमाळ परिसरातील स्थानिक आदिवासी समुदायाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांना त्यांच्या घरातच पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देऊन मोठा रोजगार मिळणार आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन पर्यटकांसोवे संवाद साधण्यापासून ते स्थानिक खाद्यपदार्थ तयार करण्यापर्यंत विविध कौशल्ये शिकवली जात आहेत. यामुळे त्यांची उपजीविका सुधारण्यास मदत होईल आणि त्यांना आपल्या गावातच सन्मानाने काम करता येईल.
जिल्हा प्रशासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना तोरणमाळमधील नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्याला प्राधान्य दिले आहे. 'होम स्टे'मुळे पर्यटक केवळ निसर्गाचा आनंदच घेणार नाहीत, तर त्यांना आदिवासी संस्कृती, त्यांची जीवनशैली, कला आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा अनुभव घेता येईल. यामुळे पर्यटकांना एक आगळावेगळा आणि अविस्मरणीय अनुभव मिळेल, तर स्थानिकांना आपली संस्कृती जपण्याचे आणि ती जगासमोर मांडण्याचे व्यासपीठ मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.