Pilgrimage Destinations Saam Tv News
महाराष्ट्र

Long Weekend: देवा तुझ्या दारी आलो... नाताळ, नववर्ष सेलिब्रेशनसह विकेंडला धार्मिक पर्यटन हाउसफुल्ल

Pilgrimage Destinations: नाताळ आणि नववर्ष अशा सलग येणार्‍या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळली आहे आणि ही गर्दी आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

Bhagyashree Kamble

नाताळ आणि नववर्ष अशा सलग येणार्‍या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळली आहे. कोल्हापुरची अंबाबाई, जेजुरी गडावरील खंडेराया, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आणि शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीला भेट देण्यासाठी देशभरातून भाविकांनी मोठी गर्दी केलीय. आणि ही गर्दी वाढत जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नाताळ आणि नववर्ष अशा सुट्ट्या आणि लाँग विकेंडमध्ये धार्मिक स्थळांवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

नाताळ आणि नववर्षात सलग सुट्ट्या असल्यानं कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटक आणि भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. शनिवार आणि रविवारी अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. पहाटेपासून पर्यटक आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, जोतिबा देवस्थान, नवीन राजवाडा या ठिकाणीही पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत.

लाँग विकेंड असल्याकारणानं जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांची गर्दी उसळली होती. शनिवार रविवार सलग सुट्ट्या असल्यानं भाविकांच्या सकाळपासूनच जेजुरी गडावर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. नाताळ, नववर्षानिमित्त देखील जेजुरी गडावर भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

सलग सुट्ट्या आल्यामुळे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शनिवारी आणि रविवारनिमित्त श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी सिंह चौकापर्यंत दर्शनासाठी रांग लागली होती. नाताळ आणि नववर्षानिमित्त दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्यानं देवस्थानचे अन्नछत्राचे भक्तनिवास देखील फुल्ल झाले आहे.

नाताळ आणि सलगच्या सुट्ट्या आणि वर्षाचा शेवट असल्यानं, शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांमुळे शेगाव शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज हाऊसफुल्ल झाले असून, दिवसेंदिवस शेगावात भाविकांची मोठी गर्दी वाढत आहे. आनंद सागर परिसरातही भाविक भेट देत असल्यानं आनंद सागर परिसरातही मोठी गर्दी बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

SCROLL FOR NEXT