Sakshi Sunil Jadhav
दरवेळी जेवणासोबत लोणचं खाणं कंटाळवाणं वाटतं.
तुम्ही घरच्या घरी आवळ्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी चटणी तयार करू शकता.
आवळे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरं, आलं, गुळ, मीठ इ.
आवळे स्वच्छ धुवून घ्या. आणि १० मिनिटे वाफवून घ्या.
वाफवलेल्या आवळ्यातून बिया काढून घ्या.
आता मिक्सरमध्ये आवळा, कोथिंबीर, मिरची, जिरं, आले, गूळ मीठ मिक्स करा.
आता थोडं पाणी मिक्स करून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
आता एका काचेच्या भांड्यात संपूर्ण चटणी ओता आणि जेवणासोबत सर्व्ह करा.